50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह 'या' स्मार्टफोनवर मिळतेय बंपर ऑफर; डिटेल्स एकदा पाहाच
Motorola Edge 40 Neo : या फोनमध्ये 6.55 इंच फुल एचडी+ पोलेड डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश दर 144 Hz आहे.
Motorola Edge 40 Neo : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन विकत घेण्याच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. अनेकदा स्मार्टफोन विकत घेताना आपल्याला कमीत कमी किंमतीत जास्तीत जास्त चांगले फीचर्स आणि सुविधा असणारे स्मार्टफोन हवे असतात. अशातच, आम्ही तुम्हाला अशा स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला चांगली ऑफर मिळू शकते. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर अनेक खास ऑफर्ससह विक्रीसाठी उपलब्ध आहे. आता या स्मार्टफोनमध्ये नेमकी किती सूट मिळतेय आणि या स्मार्टफोनचे फीचर्स नेमके काय असतील या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
किंमत आणि ऑफर
या ठिकाणी ज्या स्मार्टफोनबद्दल आम्ही सांगणार आहोत तो Motorola Edge 40 Neo आहे. हा स्मार्टफोन Flipkart वर 27,999 रुपयांऐवजी 22,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. त्यानुसार या स्मार्टफोनवर जवळपास 5,000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. सिटी-ब्रँडेड बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 10 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. तसेच, हा स्मार्टफोन EMI सह खरेदी करण्याची संधीही दिली जात आहे.
Motorola Edge 40 Neo तपशील
डिस्प्ले - या फोनमध्ये 6.55 इंच फुल एचडी+ पोलेड डिस्प्ले आहे. त्याचा रिफ्रेश दर 144 Hz आहे, आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. याचे रिझोल्यूशन 2400 x 1080 पिक्सेल आहे.
प्रोसेसर - या फोनमध्ये परफॉर्मन्स सुनिश्चित करण्यासाठी मीडियाटेक डायमेंशन 7030 चिपसेट देण्यात आला आहे.
रॅम/स्टोरेज - हा फोन 8GB+128GB आणि 12GB+256GB स्टोरेजसह येतो.
बॅक कॅमेरा - या फोनच्या बॅक पॅनलवर 50MP + 13MP कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी प्रेमींसाठी 32-मेगापिक्सलचा सेन्सर उपलब्ध आहे.
बॅटरी - फोनला पॉवर करण्यासाठी 5,000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
कनेक्टिव्हिटी - यात यूएसबी टाईप सी पोर्ट 2.0, ब्लूटूथ v5.3, वाय-फाय आणि एनएफसी सपोर्ट आहे.
कलर व्हेरिएंट - हा फोन ब्लॅक ब्युटी, कॅनील बे, पीच फज आणि सुखींग सी कलरमध्ये ऑफर करण्यात आला आहे.