एक्स्प्लोर
Advertisement
पैलवान राहुल आवारे डीवायएसपी होणार
राहुल आवारे आणि उत्कर्ष काळे या दोन्ही पैलवानांना शरद पवारांच्या वतीनं प्रत्येकी 12 लाख रुपयांची वार्षिक शिष्यवृत्ती घोषित करण्यात आली.
पुणे : राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या पैलवान राहुल आवारे याला शासकीय सेवेत रुजू करुन घेणार असल्याची माहिती राज्याचे समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. त्यामुळे राहुल आवारे आता डीवायएसपी होणार हे निश्चित झाले आहे.
राहुल आवारे याला शासकीय सेवेत घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्की केले आहे, अशी माहिती दिलीप कांबळे यांनी दिली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता पैलवान राहुल आवारेचा आज पुण्यात सत्कार करण्यात आला. यावेळी दिलीप कांबळे बोलत होते.
महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या पैलवानांचा शरद पवारांच्या वतीने पुण्यात सत्कार झाला. या सत्कारावेळी शरद पवारांच्या अनुपस्थितीत खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. यावेळी अभिजीत कटके आणि किरण भगत यांच्यापाठोपाठ राहुल आवारे आणि उत्कर्ष काळे या दोन्ही पैलवानांना शरद पवारांच्या वतीनं प्रत्येकी 12 लाख रुपयांची वार्षिक शिष्यवृत्ती घोषित करण्यात आली.
ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत राहुल आवारेनं 57 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली होती.
पाहा बातमीचा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
सोलापूर
निवडणूक
Advertisement