एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
कुस्तीपटू नरसिंग यादव उत्तेजक सेवन चाचणीत दोषी
मुंबई : भारताचा कुस्तीपटू नरसिंग यादवच्या ऑलिम्पिकमधील सहभागाच्या स्वप्नांना सुरुंग लागण्याची शक्यता आहे. उत्तेजक द्रव्य चाचणीत नरसिंग दोषी आढळल्याचा आरोप होत आहे.
नाडा अर्थात नॅशनल अँटी डोपिंग असोसिएशनने सोनिपतमधल्या साईच्या लॅबोरेटरीमध्ये 5 जुलै रोजी चाचणी केली होती. या चाचणीमधे नरसिंग यादव दोषी आढळल्याची माहिती आहे.
महाराष्ट्राचा पैलवान त्याच्या कामगिरीसोबतच सततच्या वादांमुळे चर्चेत राहिला आहे. ऑलिम्पिकला सुशीलकुमार जाणार की नरसिंग यावरुन चढाओढ सुरु होती. अखेर नरसिंगच्या बाजूने कौल लागल्यामुळे महाराष्ट्रातून आनंद व्यक्त केला जात होता. मात्र तो डोपिंग चाचणीत दोषी आढळल्याच्या वृत्ताने कुस्ती क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.
भारतीय कुस्ती महासंघाकडून तूर्तास या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. त्याचप्रमाणे नरसिंग यादव आणि त्याचे कोच यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
काय होता नरसिंग विरुद्ध सुशीलकुमार वाद?
रिओ ऑलिम्पिकच्या 74 किलो वजनी गटात महाराष्ट्राचा नरसिंग यादवच भारताचं प्रतिनिधित्व करेल, यावर दिल्ली उच्च न्यायालयानंही शिक्कामोर्तब केलं होतं. त्यामुळे कुस्तीपटू सुशील कुमार याचे रिओ ऑलिम्पिकसाठीचे स्वप्न भंगलं होतं.
गेल्या वर्षी लास वेगासमध्ये झालेल्या जागतिक कुस्ती विजेतेपद स्पर्धेत नरसिंग यादवनं कांस्य पदकाची कमाई करून रिओ ऑलिम्पिकसाठीचा कोटा मिळवला होता. त्यामुळं भारतीय कुस्ती फेडरेशननंही नरसिंगलाच रिओ ऑलिम्पिकला पाठवण्याचा निर्णय घेतला.
भारताचा डबल ऑलिम्पिक विजेता पैलवान सुशीलकुमारला हा निर्णय रुचला नाही. त्यानं आणि त्याच्या समर्थकांनी भारतीय कुस्ती फेडरेशनच्या या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली.
रिओ ऑलिम्पिकच्या 74 किलो वजनी गटात भारताचं प्रतिनिधित्व कुणी करावं या निर्णयासाठी आपली आणि नरसिंगची चाचणी कुस्ती खेळण्याची मागणी केली होती. पण दिल्ली उच्च न्यायालयानं दहा दिवस सुरू असलेल्या सुनावणीनंतर सुशीलकुमारची मागणी फेटाळली.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
कोल्हापूर
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























