एक्स्प्लोर

Shoaib Akhtar : पाकिस्तानाच्या फलंदाजांना शोएब अख्तरने झापलं, म्हणाला 'वो टैलेंट नहीं था...'

Shoaib Akhtar On Pakistan Batsman : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तानच्या फलंदाजांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई : जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांच्यासमोर पाकिस्तानी (Pakistan) फलंदाजांनी पूर्णपणे शरणागती पत्करली. भारताच्या (India) पाचही गोलंदाजांनी 2-2 विकेट घेतल्या आणि 42.5 षटकांत पाकिस्तानला 191 धावांवर रोखलं. पाकिस्तानची ही खराब फलंदाजी पाहून पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) चांगलाच संतापला. त्याने एक व्हिडीओ जारी करुन त्यांचा हा रोष व्यक्त केला. या व्हिडीओमध्ये त्याने म्हटलं की, 'पाकिस्तानकडे आता लांब धावा करण्याचं कौशल्य नाही राहिलं.' अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर विश्वचषकाचा भारत विरुद्ध पाकिस्तान खेळवला गेला. यामध्ये भारताचे गोलंदाज हे पाकिस्तानच्या फलंंदाजांवर वरचढ ठरल्याचं पाहायला मिळालं. 

शोएब अख्तरनं पुढे बोलताना म्हटलं की, 'खेळाडूंना एक उत्तम पीच मिळालं. पण पाकिस्तानचे खेळाडू त्याचा योग्य वापर करु शकले नाहीत. त्या व्हिडीओमध्ये देखील तो म्हणाला की, म्ही सामना पाहिला असेल, किती सुंदर विकेट होती. किती जबरदस्त पीच सर्वांना मिळाली.  ब्दुल्ला शफीकला मिळालं, इमामला मिळालं, बाबरला मिळालं… पण पाकिस्तानला ते वापरता आलं नाही. पाकिस्तानकडे लांब धावा करण्याची आणि त्याचा वापर करण्याचं कौशल्यच नाही.' 

'पाकिस्तान पुन्हा एकदा फलंदाजी आणि विकेट्समुळे पराभूत होताना पाहणं हे खरच खूप कठिण आहे. चेंडूमध्ये काही नसताना तुम्ही क्रॉस बॅटने का खेळत आहात. पाकिस्तान इतक्या चांगल्या परिस्थितीचा उपयोग करु शकलं नाही हे पाहणं खरचं खूप कठिण आहे. चांगल्या विकेट्स गेल्याने खूप चांगली संधी हुकली', अशी खंत शोएब अख्तरने व्यक्त केलीये. 

शोएब अख्तरनं भारताला डिवचलं 

पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब अख्तर याने ट्वीट करत भारतीयांना छेडले आहे. 'सव्वा लाख लोकांना एकट्याने शांत करण्यासाठी फायर लागते. तुमच्यामध्ये आग असेल तेव्हाच हे शक्य होतं. ' असे ट्वीट शोएब अख्तर याने केले. याशिवाय सगळे शांत का आहेत, असेही ट्वीट शोएब अख्तरने केले. या ट्वीटचीही जोरदार चर्चा सुरु आहे. शोएब अख्तरच्या ट्वीटला भारतीय नेटकऱ्यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले. अनेकांनी शोएबला 2003 मधील सचिन तेंडुलकरच्या षटकाराची आठवण करुन दिली. 

सुरुवात चांगली तरी धावा कमीच

पाकिस्तानाच्या फलंदाजांनी अगदी योग्य अशी सुरुवात केली. पण तरीही त्यांना भारताच्या पुढे आव्हान ठेवताना 200 चा टप्पा देखील गाठता आला नाही. संघाने 13व्या षटकात 73 धावांवर 2 विकेट गमावल्या असतील, पण त्यानंतर 30व्या षटकात 155 धावांवर संघाला तिसरा धक्का बसला. यानंतर संघाला सावरता आले नाही आणि 191 धावा झाल्या. संघासाठी कर्णधार बाबर आझमने 7 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 50 (58) धावा केल्या.

हेही वाचा : 

सव्वा लाख प्रेक्षकांना एकट्याने शांत करण्यासाठी Fire लागते, शोएब अख्तरनं भारताला डिवचलं!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan: भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Heeramandi : 'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
Ghatkopar Hoarding Falls: अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
Weather Updates: पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 80 : आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines  : 8 AM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGhatkopar hoarding collapse :घाटकोपर पेट्रोल पंपावर महाकाय बॅनर कोसळला, मृतांचा आकडा 14 वर:ABP MajhaTOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 14 मे 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Heeramandi : 'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
'हीरामंडी'तील आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी'वॉकने वाढवला इंटरनेटचा पारा; पाहा व्हिडीओ
Ghatkopar Hoarding Falls: अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
Weather Updates: पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
Shah Rukh Khan : शाहरुख खानने 'या' चित्रपटात दिलाय इंटिमेट सीन; पण चाहत्यांना कधीच पाहता येणार नाही 'हा' सिनेमा
शाहरुख खानने 'या' चित्रपटात दिलाय इंटिमेट सीन; पण चाहत्यांना कधीच पाहता येणार नाही 'हा' सिनेमा
World Most Expensive Movie : जगातला सर्वात महागडा चित्रपट कोणता? 'या' बजेटमध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पा 20 वेळा बनेल
जगातला सर्वात महागडा चित्रपट कोणता? 'या' बजेटमध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पा 20 वेळा बनेल
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
Embed widget