सव्वा लाख प्रेक्षकांना एकट्याने शांत करण्यासाठी Fire लागते, शोएब अख्तरनं भारताला डिवचलं!
Shoaib Akhtar On Indian Crowd : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडयमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी लाखभर चाहत्यांचा महासागर लोटला होता.
Shoaib Akhtar On Indian Crowd : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडयमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी लाखभर चाहत्यांचा महासागर लोटला होता. स्टेडियममध्ये जिकडे पाहील तिकडे चाहत्यांचा निळा समुद्र दिसत होता, या सर्व लाखभर चाहत्यांना पाकिस्तानच्या वादळे काही काळासाठी शांत ठेवले होते. बाबर आझम याने चिवट आणि संयमी फंलदाजी करत भारताच्या चाहत्यांना शांत केले होते. पण फक्त थोड्यावेळापर्यंत बाबर आझम याला सिरजाने तंबूत पाठवत पाकिस्तानची फलंदाजीचे कंबरडे मोडले होते.
पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब अख्तर याने ट्वीट करत भारतीयांना छेडले आहे. 'सव्वा लाख लोकांना एकट्याने शांत करण्यासाठी फायर लागते. तुमच्यामध्ये आग असेल तेव्हाच हे शक्य होतं. ' असे ट्वीट शोएब अख्तर याने केले. याशिवाय सगळे शांत का आहेत, असेही ट्वीट शोएब अख्तरने केले. या ट्वीटचीही जोरदार चर्चा सुरु आहे. शोएब अख्तरच्या ट्वीटला भारतीय नेटकऱ्यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले. अनेकांनी शोएबला 2003 मधील सचिन तेंडुलकरच्या षटकाराची आठवण करुन दिली.
Sawa lakh banda akele chup kerwanay k liye fire chahiye hota hai. Yeh sirf tab ho sakta hai jab aap k andar wo aag ho.
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) October 14, 2023
Wah re yeh khamosh chokkay!!
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) October 14, 2023
बाबर आझम याने रिजवानला साथीला घेत पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. बाबर आणि रिजवान यांच्यामध्ये अर्धशतकी भागिदारी झाली. पाकिस्तानची धावसंख्याही 150 पार पोहचली होती. ही जोडी धोकादायक ठरणार, असेच वाटत होते. लाखभर चाहतेही थोड्यावेळासाठी शांत झाले होते. त्यावेळी मोहम्मद सिराजने बाबरचा बोल्ड काढला अन् चाहत्यांने उत्साहाचे वातावरण झाले. त्यानंतर पाकिस्तानची फंलदाजी ढेपाळली. 155 धावांवर बाबर बाद झाला. त्यानंतर पुढील 36 धावांत पाकिस्तानचे आठ फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परतले. पाकिस्तानचा संपूर्ण डाव फक्त 191 धावांत संपुष्टात आला.
भारताच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सेनापती बाबर आझम तंबूत परतल्यानंतर इतर सैनिकांनी भारताच्या गोलंदाजीपुढे शरणागती पत्कारली. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 42.4 षटकात 191 धावांपर्यंत मजल मारु शकला. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझम याने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. त्याशिवाय मोहम्मद रिजवान याने 49 धावांचे योगदान दिले. भारताकडून बुमराह, सिराज, हार्दिक अन् कुलदीप यांनी भेदक मारा केला. भारताला विजयासाठी 192 धावांचे आव्हान आहे.