Rohit Sharma & Jasprit Bumrah : इकडं BCCI टीम इंडियाला सव्वाशे कोटींचा तोफा देणार अन् तिकडं ICCकडून रोहित अन् बुमराहला स्पेशल गिफ्ट!
भारतीय क्रिकेट संघाने 2024 टी-20 विश्वचषक जिंकून इतिहास रचला. शनिवारी, 29 जून रोजी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
Rohit Sharma & Jasprit Bumrah : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि अन् मुलुखमैदानी तोफगोळा जसप्रीत बुमराह टीम इंडियाच्या टी-20 वर्ल्डकप विजयाचे हिरो ठरले होते. त्यांच्या याच कामगिरीने जून 2024 च्या ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी नामांकित झाले आहेत.
ROHIT SHARMA AND JASPRIT BUMRAH HAVE BEEN NOMINATED FOR THE ICC PLAYER OF THE MONTH AWARD. 🐐🇮🇳 pic.twitter.com/IhlUG1aSP2
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 4, 2024
रोहित स्पर्धेत 36.71 च्या सरासरीने आणि 156.70 च्या स्ट्राइक रेटसह 257 धावा करून स्पर्धेतील दुसरा सर्वोच्च धावा करणारा खेळाडू ठरला. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 41 चेंडूत 92 आणि इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत 39 चेंडूत 57 धावा केल्या होत्या.
Team India's Parade bus stuck in traffic before it could pick the Indian players. 😂 (Devendra Pandey). pic.twitter.com/RjYSIHfvFk
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 4, 2024
दुसरीकडे, मालिकावीर बुमराहने आठ सामन्यांमध्ये 15 बळी घेतले. पाकिस्तानविरुद्धचा महत्त्वपूर्ण स्पेल आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात निर्णायक कामगिरीसह त्याने टायमिंगवर घेतलेल्या विकेट भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरल्या.त्यांच्यासोबत अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज जो 281 धावांसह अव्वल स्थानी आहे, तो सुद्धा पुरस्कारांसाठी नामांकित झाला आहे.
It was an honour to be invited to our honourable Prime Minister’s residence this morning. Thank you so much for your warmth and hospitality sir @narendramodi 🇮🇳 pic.twitter.com/xp8YBc3gD9
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) July 4, 2024
भारतीय क्रिकेट संघाने 2024 टी-20 विश्वचषक जिंकून इतिहास रचला. शनिवारी, 29 जून रोजी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
It's raining, raining heavily but nothing can stop cricket fans in Mumbai to see their heroes. 👌 pic.twitter.com/yO4LYGW73E
— Johns. (@CricCrazyJohns) July 4, 2024
वर्ल्डकपसह टीम इंडिया मायदेशी परतली आहे. टीम इंडिया बार्बाडोसहून थेट दिल्लीत पोहोचली. टीम इंडियाच्या आगमनानंतर दिल्ली विमानतळावर वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. यावेळी कर्णधार रोहित शर्मा हातात ट्रॉफी उंचावताना दिसून आला.
इतर महत्वाच्या बातम्या