PAK vs NED: हारिस रौफच्या खतरनाक बाऊन्सर, नेदरलँड्सचा फलंदाज जबर जखमी; सोडावं लागलं मैदान, पाहा व्हिडिओ
Concussion Substitute Rule: ब्रिस्बेनच्या (Brisbane) गाबा स्टेडियवर (The Gabba) झिम्बाब्वेविरुद्ध आज खेळण्यात आलेल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघानं (BAN vs ZIM) 3 धावांनी विजयी मिळवला.
Concussion Substitute Rule: ब्रिस्बेनच्या (Brisbane) गाबा स्टेडियवर (The Gabba) झिम्बाब्वेविरुद्ध आज खेळण्यात आलेल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघानं (BAN vs ZIM) 3 धावांनी विजयी मिळवला. या स्पर्धेतील पाकिस्तानचा पहिलाच विजय आहे. यापूर्वी पाकिस्तानला त्यांच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. भारत आणि झिम्बाब्वेविरुद्ध सामन्यात पाकिस्तानच्या संघ पराभूत झाला होता. मात्र, नेदरलँड्सविरुद्ध सामन्यात विजय मिळवत पाकिस्तानच्या संघानं उपांत्य फेरी गाठण्याचं आव्हान जिवंत ठेवलंय. या सामन्यात पाकिस्तानचा गोलंदाज हारिस राऊफच्या (Haris Rauf) खतरनाक बाऊन्सरनं नेदरलँड्सचा फलंदाज बास डी लीडला (Bas de Leede) जखमी केलं. ज्यानंतर बास डी लीडला मैदान सोडावं लागलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
व्हिडिओ-
Haris rauf's bouncer 🔥.
— Intro Vert (@cageddbird) October 30, 2022
Haris Rauf's nasty delivery hits Bas de Leede on the grille in front of the nose
There's a cut on his face, just under his left eye .#T20WorldCup2022 #PAKvsNED pic.twitter.com/XslpYkPWFk
नेदरलँड्सच्या डावातील सहाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर हारिस रौफनं खतरनाक बाऊन्सर टाकला. या चेंडूवर क्रीजवर असलेल्या बास डी लीडनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, चेंडू जाऊन बास डी लीडच्या हेल्मेटवर आदळला. हे पाहून मैदानात उपस्थित असलेले पाकिस्तानचे क्रिकेटपटू देखील त्याच्या जवळ धावून आले. त्यानंतर फिजियोलाही बोलवण्यात आलं. हारिस रौफच्या बॉऊन्सरमुळं बास डी लीडच्या चेहऱ्यावर दुखापत झाली. ज्यामुळं त्याला मैदान सोडावं लागलं.बास डी लीड फलंदाजीसाठी परत न आल्यानं नेदरलँड्सनं लोगान व्हॅन बीकला त्यांचा कन्कशन पर्याय म्हणून संघात सामील करून घेतलं.
पाकिस्तानचा तीन धावांनी विजय
ब्रिस्बेनच्या द गबा स्टेडियमवर बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यात सुपर फेरीतील सामना खेळला गेला. या थरारक सामन्यात बांगलादेशच्या संघानं तीन धावांनी विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करत झिम्बाब्वेसमोर 20 षटकात सात विकेट्स गमावून 151 धावांचं लक्ष्य ठेवलं. बांगलादेशकडून सलामीला आलेल्या नजमुल हुसेन शांतोनं 55 चेंडूत 71 धावांची शानदार खेळी केली.बांग्लादेशच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेचा संघाला 147 धावापर्यंत मजल मारता आली.
झिम्बाब्वेच्या संघाची खराब फलंदाजी
बांगलादेशनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाव्वेच्या संघाची दमछाक झाल्याचं पाहायला मिळाली. सलामी फलंदाज वेस्ली माधवेरेनं (4 धावा) पहिल्याच षटकात विकेट गमावली. याशिवाय, कर्णधार क्रेग इर्विनही (8 धावा) मोठी खेळ करण्यास अपयशी ठरला.तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मिल्टन शुम्बा स्वस्तात माघारी परतला. त्यानं या सामन्यात अवघ्या आठ धावा केल्या. मुस्तफिझूर रहमाननं त्याला आऊट केलं. तर, झिम्बाब्वेचा संघाचा स्टार फलंदाज सिकंदर रझा खातं न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला.
हे देखील वाचा-