T20 World Cup 2022 : पाकिस्तानच्या जर्सीवर मीम्सचा पाऊस, नेटकऱ्यांनी शेअर केल्या एकापेक्षा एक मजेशीर पोस्ट
Pakistan Team Jersey : पाकिस्तान संघाने आगामी टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेपूर्वी जर्सी लॉन्च केली पण जर्सी लॉन्च होण्यापूर्वी काही फोटो व्हायरल झाले असता त्यावरुन नेटकऱ्यांनी विविध मजेशीर असे मीम्स शेअर केले आहेत.
Pakistan Team New Jersey : आगामी टी20 विश्वचषक स्पर्धेला (ICC T20 World Cup 2022) अजून महिनाभर शिल्लक असताना सोशल मीडियावर या भव्य स्पर्धेसाठी अगदी माहोल बनताना दिसत आहे. विविध देश आपले संघ जाहीर करत असून नव्या जर्सीही लॉन्च करत आहेत. पाकिस्तान संघाने आपली जर्सी लॉन्च करण्यापूर्वीच त्यांच्या जर्सीचे फोटो लीक झाले होते, दरम्यान या जर्सीच्या फोटोंवर काही नेटकऱ्यांनी मजेशीर मीम्मस तयार करुन शेअर केले आहेत.
आता मीम्समध्ये विविध एडिटेड फोटो शेअर करत काही नेटकरी मजेशीर फोटो पोस्ट करत आहेत. या फोटोंमध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा जर्सीतील फोटो मीमसोबत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यावर चाहतेही हटके कमेंट्स करत आहेत. यातील काही खास मीम्मस पाहूया...
Same energy #Pakistan #new #kit pic.twitter.com/qnBm4Jth2w
— rafay👑❤️ (@Rafay_ali32) September 18, 2022
Pakistan ki kit for worldcup hows it? pic.twitter.com/isRrZx3uHV
— Ashfaq Ali (@ASHFAQALI1) September 18, 2022
Pakistan's kit for WT20? Someone please say No pic.twitter.com/mRZo4qrWSZ
— Noman Bin Basheer (@NomanBinBasheer) September 18, 2022
इस्लामाद युनायटेडच्या ट्वीटर हँडलवर जर्सीचे फोटो
रविवारी (18 सप्टेंबर) टीम इंडियाने आपली जर्सी लॉन्च केल्यानंतर आता लगेचच आज (19 सप्टेंबर) पाकिस्तान संघाची विश्वचषकासाठीची जर्सी समोर आली आहे. पीसीएलमधील संघ इस्लामाद युनायटेडच्या ट्वीटर हँडलवरही या जर्सीचे फोटो असून जर्सी समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या जर्सीचे फोटो शेअर केले आहेत. पाकिस्तान टीमने जर्सी लॉन्च केल्यानंतर खेळाडूं नवी जर्सी घातलेले फोटोही शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये कर्णधार बाबर आझम तसंच युवा गोलंदाज नसीम शाह, अष्टपैलू शादाब खान यांच्यासह महिला खेळाडूही दिसत आहेत. पाकिस्तान संघ हीच जर्सी घालून स्पर्धेत उतरणार असून पहिला सामना भारताविरुद्ध असणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना 26 ऑक्टोबररोजी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न मैदानात खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे या बहुप्रतिक्षित सामन्याची सर्व तिकिटं आधीच विकिली गेली आहेत.
🚨 Pakistan's Jersey for the #T20WorldCup 🚨
— Islamabad United (@IsbUnited) September 19, 2022
What's your favorite Pakistan jersey ever?#UnitedWeWin pic.twitter.com/lKaBegHyns
हे देखील वाचा-