(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sunil Chhetri Durand Cup : फोटोत येण्यासाठी पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा फुटबॉलपटू सुनिल छेत्रीला 'दे धक्का', नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
Durand Cup 2022 : डुरंड कप 2022 स्पर्धा बंगळुरु एफसीने जिंकल्यानंतर सुनील छेत्री चषक घेण्यासाठी स्टेजवर आला, त्यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल यांनी फोटोत येण्यासाठी छेत्रीला मागे ढकलल्याचं दिसून आलं, यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Sunil Chhetri Durand Cup : भारतीय फुटबॉल (Indian Football Team) संघाचा कर्णधार सुनील छेत्री (Sunil Chhetri) भारतीय फुटबॉलला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला आहे. त्याची तुलना महान फुटबॉलर्सबरोबर केली जाते. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये त्याने केलेल्या गोल्सची संख्या लक्षणीय आहे. पण असं असतानाही पश्चिम बंगालच्या राज्यपालांकडून सुनीलचा अपमान करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
डुरंड कप 2022 स्पर्धेच्या (Durand Cup 2022) अंतिम सामन्यात बंगळुरु एफसीने मुंबई एफसी संघाला 2-1 च्या फरकाने मात देत चषकावर नाव कोरलं आहे. सुनीलच्या दमदार खेळासह सर्व संघाने मिळून हा चषक जिंकला. पण याच स्पर्धेचा विजयी चषक स्वीकारताना मात्र सुनीलचा अपमान झाल्याचं दिसून आलं. डुरंड कपचा अंतिम सामना झाल्यानंतर बक्षिस वितरण समारंभ सुरु होता, यावेळी सुनील छेत्री चषक स्वीकारत असताना पश्चिम बंगालचे राज्यपाल ला गणेसन (La Ganesan) हे देखील त्याठिकाणी उपस्थित होते. त्यावेळी सुनील छेत्री ट्रॉफी घेत असताना ला गणेसन यांनी फोटोत योग्यप्रकारे येण्यासाठी चक्क सुनीलला बाजूला सारल्याचं दिसून आलं. या गोष्टीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. माजी भारतीय क्रिकेटर आकाश चोप्रा यानेही हा व्हिडीओ रिट्वीट करत अपमानजनक (Disrespectfull) असं कॅप्शन दिलं आहे.
पाहा व्हिडीओ-
Congratulations to La Ganesan, Governor of West Bengal, for winning the Durand Cup 2022. pic.twitter.com/GiICyecRHb
— Anshul Saxena (@AskAnshul) September 18, 2022
विशेष म्हणजे या पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान हा असा प्रकार केवळ सुनीलसोबतच नाही, तर बंगळुरूच्या विजयाचा हिरो असलेल्या शिवशक्ती या खेळाडूसोबतही घडला. शिवशक्तीसोबतही अशाचप्रकारे अपमान झाल्याचा व्हिडीओही व्हायरल होत आहे.
Congratulations to La Ganesan, Governor of West Bengal, for winning the Durand Cup 2022. pic.twitter.com/GiICyecRHb
— Anshul Saxena (@AskAnshul) September 18, 2022
बंगळुरु एफसी (BFC) संघासाठी शिवशक्ती आणि ब्राझीलच्या अॅलन कोस्टा यांनी गोल केले, तर अपुइया याने मुंबई सिटी एफसीसाठी (MCFC) एकमेव गोल केला. ज्यामुळे अटीतटीच्या सामन्यात अखेर बंगळुरु एफसीचा संघच विजयी झाला.
हे देखील वाचा-