एक्स्प्लोर
Advertisement
IND vs PAK, Toss Update : भारताच्या बाजूने नाणेफेक, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
IND vs PAK : आज भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला मेलबर्नच्या मैदानावर खेळवला जात आहे. नुकतीच नाणेफेक झाली असून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे.
IND vs PAK, T20 Toss Update : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात टी20 विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेतील महामुकाबला रंगत असून नुकतीच नाणेफेक झाली आहे. भारताने नाणेफेक जिंकत आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानला भारतासमोर गोलंदाजी करताना याआधीही अडचणी आल्याने भारताने प्रथम बोलिंगचा निर्णय़ घेऊन पाकिस्तानला कमी धावांत रोखण्याचा निर्धार करत हा निर्णय़ घेतला आहे. तसंच भारत सामन्यात 7 फलंदाज घेऊन उतरत असून चेस करणं शक्य असल्याने हा निर्णय़ घेतला आहे.
T20 WC 2022. India won the toss and elected to field. https://t.co/mc9useyHwY #INDvPAK #T20WorldCup
— BCCI (@BCCI) October 23, 2022
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तान असणाऱ्या ग्रुपमध्ये इतर संघ तितके खास फॉर्ममध्ये नसल्याने आजचाच सामना जिंकणं भारत आणि पाकिस्तान दोघांसाठी महत्त्वाचं असेल,तर अशा या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारताच्या प्लेईंग 11 चा विचार करता सात फलंदाजांसह भारत मैदानात उतरत आहे. विशेष म्हणजे ऋषभ पंतला संघात जागाम मिळाली नसून दिनेश कार्तिक यष्टीरक्षक असणार आहे. तर गोलंदाजीमध्ये युजवेंद्र चहल नसून अष्टपैलू अक्षरला संधी मिळाली आहे, तर नेमकी अंतिम 11 कशी आहे पाहूया...
कसे आहेत दोन्ही संघ?
भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.
पाकिस्तान: बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शान मसूद, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.
भारत विरुद्ध पाकिस्तान टी20 Head to Head
टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ यांच्यात आतापर्यंत 11 टी-20 सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचं पारडं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 11 पैकी 8 सामन्यात विजय मिळवलाय. तर, पाकिस्तान संघाला 3 सामने जिंकता आले आहेत.
हे देखील वाचा-
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement