एक्स्प्लोर

Gas Shortage India : सलग दुसऱ्या आठवड्यात युद्धज्वर शिगेला, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला गॅस पुरवठ्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्देश

High Court on Gas Shortage: भारतात एलपीजी गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला घरगुती वापरासाठी आवश्यक एलपीजी पुरवठा प्राथमिकतेने करा असे निर्देश दिले आहे.

Iran Israel War : अमेरिका-इस्रायल-इराण (Iran Israel War)  यांच्यात आज सलग 14 व्या दिवशी देखील युद्ध सुरु आहे. या युद्धाचा थेट फटका आता जागतिक अर्थव्यवस्थेला बसत असून युद्धामुळे जगभरात आणि विशेषतः भारतात एलपीजी (LPG) गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. याचा फटका आता हॉटेल्स आणि कारखान्यांसोबतच शाळांसारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांनाही बसत आहे. परिणामी देशात इंधन टंचाईची मोठी समस्या निर्माण झाली आहे. अशातच आता या गंभीर विषयात मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) राज्य सरकारला घरगुती वापरासाठी आवश्यक एलपीजी पुरवठा प्राथमिकतेने करा असे निर्देश दिले आहे. (Gas Shortage India) 

सध्या देशासह राज्यात उद्भवलेल्या गॅसटंचाईच्या परिस्थिती बाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला उपाययोजनेसंदर्भात महत्वपूर्ण निर्देश दिले आहे. या प्रकरणी 17 मार्चपर्यंत राज्य सरकारला जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले आहे. राज्यात घरगुती एलपीजी सिलेंडरचा पुरवठा वाढविण्यासाठी कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया कंपनीच्या सहा विक्रेत्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर अनिल किलोर आणि राज वाकोडे यांच्या समक्ष सुनावणी झाली.

Gas Shortage India : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार घरगुती एलपीजी पुरवठा प्राथमिकतेने करण्याचे निर्देश

अमेरिका इराण युद्धामुळे सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, सीरियासह ईतर देशातून होणारा तेल पुरवठा बाधीत झाला आहे. त्याचा परिणाम एलपीजी उत्पादनावर पडल्याने ग्राहकांना एलपीजी सिलेंडरचा तुटवडा भेडसावत आहे. त्यामुळे पेट्रोलियम व नॅचरल गॅस मंत्रालयाने एलपीजी उत्पादन व पुरवठ्याला प्राधान्य देण्याचे आदेश जारी केले असताना कॉन्फिडन्स कंपनी घरगुती एलपीजी सिलेंडरचा पुरवठा वाढवण्यासाठी दुर्लक्ष करत आहे. याकरिता कॉन्फिडन्स कंपनी घरगुती एलपीजी सिलेंडरचा पुरवठा वाढविण्याकडे दुर्लक्ष करत आहे. मात्र कंपनीने निर्यात धोरणाचे कारण देत नकार दिल्याचा याचिकेत आरोप करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने हा विषय अतिशय गंभीर असल्याचे मत व्यक्त करत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार घरगुती एलपीजी पुरवठा प्राथमिकतेने करण्याचे निर्देश दिले आहेत.

Gas Shortage India : भारतात दरवर्षी किती एलपीजी वापरला जातो?

अहवालांनुसार, भारत दरवर्षी अंदाजे 31.3  दशलक्ष टन द्रवीभूत पेट्रोलियम गॅस (एलपीजी) वापरतो. या एकूण गरजांपैकी सुमारे 87  टक्के घरगुती स्वयंपाकात वापरला जातो. सर्वात मोठी चिंता अशी आहे की भारताच्या एकूण एलपीजी गरजांपैकी 62 टक्के आयात केली जाते आणि या आयातीपैकी 85-90 टक्के होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाते. अमेरिका-इराण युद्धामुळे हा मार्ग सध्या बंद आहे. सौदी अरेबियासारख्या देशांमधून एलपीजी टँकर या मार्गाने भारतात पोहोचत असत.

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात कथित मटका माफियाचं फोटोसेशन; व्हीआयपी दर्शनावरून खळबळ; आमदाराचा P.A.चर्चेत
तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात कथित मटका माफियाचं फोटोसेशन; व्हीआयपी दर्शनावरून खळबळ; आमदाराचा P.A.चर्चेत

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव

Embed widget