Virat Kohli : ...अन् कोहली संतापला! हॉटेल रुमचा व्हिडीओ लीक, व्हिडीओ बनवणाऱ्या कर्मचाऱ्याला हटवत हॉटेलचा माफीनामा
Hotel Apologised to Kohli : हॉटेल रुमचा व्हिडीओ व्हायरल झाल्याप्रकरणी हॉटेलनी माफी मागत संबंधित कर्मचाऱ्याला कामावरून कमी केलं आहे.
Hotel Crown Perth Apologised to Virat : भारतीय क्रिकेटपटूंना ( Indian Cricketer ) देव मानून पूजा करणारे देशात कोट्यवधी चाहते आहेत. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचाही ( Virat Kohli ) प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. विराटच्या लाईफस्टाईलपासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. सध्या कोहली टी-20 विश्वचषकासाठी ( T20 World Cup 2022 ) ऑस्ट्रेलियामध्ये ( Australia ) आहे. विराट ऑस्ट्रेलियामध्ये ज्या हॉटेलमध्ये राहतोय, त्या हॉटेलमधील त्याच्या रुमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. हॉटेल रुमचा हा व्हीडिओ लीक झाल्याने कोहली चांगलाच संतापला. त्यानंतर आता हॉटेलने याप्रकरणी माफी मागितली आहे.
हॉटेल रुमचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर संतापला कोहली
टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियामध्ये टी20 विश्वचषक खेळत आहे. सध्या टीम इंडियाचे खेळाडू ऑस्ट्रेलियामध्ये हॉटेल क्राऊन पर्थमध्ये ( Hotel Crown Perth ) राहत आहेत. दरम्यान या हॉटेलमधील विराट कोहलीच्या रुममधील व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. या प्रकरणी आता हॉटेल क्राऊन पर्थने माफी मागितली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कोहलीने इंस्टाग्राम पोस्टद्वारे आपला संताप व्यक्त केला होता. त्यानंतर हॉटेलने विराटची माफी मागितली आहे. दरम्यान कोहलीच्या पोस्टनंतर पर्थमधील हॉटेल क्राऊननं माफी मागितलीय.. तसंच हा व्हीडिओ बनवणारा आणि तो पोस्ट करणाऱ्या हॉटेल कर्मचाऱ्याला हटवण्यात आलं आहे.
व्हिडीओ शेअर करत विराटने व्यक्त केला होता संताप
View this post on Instagram
हॉटेलने माफी मागत व्हिडीओ बनवणाऱ्या कर्मचाऱ्याला हटवलं
हॉटेल क्राऊन पर्थने या प्रकरणात सांगितलं आहे की, आम्ही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. विराटच्या हॉटेल रुमचा व्हिडीओ काढणारा हॉटेल कर्मचारी कंत्राटी कर्मचारी आहे. ज्या कर्मचाऱ्याने कोहलीच्या रुपचा व्हिडीओ काढून व्हायरल केला त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.' हॉटेलच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'आमच्याकडून झालेल्या निष्काळजीपणाबाबत आम्ही माफी मागतो. प्रकरणात आवश्यक कठोर पाऊल उचलली जातील. संबंधित कर्मचाऱ्याला कामावरून हटवण्यात आलं आहे. यापुढे अशी गोष्ट घडणार नाही याची काळजी घेऊ.'
हॉटेल कर्मचाऱ्यांची विराटकडून कानउघडणी
विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत व्हिडीओ व्हायरल झाल्याप्रकरणी नाराजी आणि संताप व्यक्त केला होता. विराटने पोस्टमध्ये लिहिलं की, 'हे वागणं योग्य नाही. या व्हिडीओमुळे माझ्या प्रायव्हसीबद्दल ( Privacy ) प्रश्न उपस्थित झाला आहे.' कोहलीने चाहत्यांना त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा आणि प्रायव्हसीचा आदर करण्याचं आवाहन केलं आहे.