Virat Kohli : हॉटेल रुमचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोहली संतापला, हॉटेल कर्मचाऱ्यांची विराटकडून कानउघडणी
Viral Video Virat Kohli's Hotel Room : हॉटेल रुमचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विराट कोहली चांगलाच संतापला आहे. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.
Virat Kohli Gets Angry on Hotel Staff : भारताचा ( India ) स्टार क्रिकेटपटू ( Cricketer ) विराट कोहलीने ( Virat Kohli ) सोशल मीडियावर ( Social Media ) एक पोस्ट शेअर करत हॉटेल कर्मचाऱ्यावर भडकला आहे. विराटने इंस्टाग्रामवर (Virat Kolhi Instagram ) व्हिडीओ शेअर करत हॉटेल कर्मचाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हा जागतिक स्तरावर सर्वात प्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. सोशल मीडियावर 250 दशलक्ष पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. विराटचा मोठा चाहता वर्ग आहे. विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी किंवा त्याच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. मात्र, यामुळे कधीकधी या स्टार क्रिकेटपटूला याचा त्रासही सहन करावा लागतो.
हॉटेल रुमचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोहली संतापला
विराट कोहली सध्या टी-20 विश्वचषकासाठी ( T20 World Cup 2022 ) ऑस्ट्रेलियामध्ये ( Australia ) आहे. सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये हॉटेलमध्ये राहत आहे. या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी विराट कोहलीच्या हॉटेल रुमचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विराट हॉटेल कर्मचाऱ्यांवर चांगलाच संतापला आहे. कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
हॉटेल कर्मचाऱ्यांची विराटकडून कानउघडणी
विराट कोहलीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, हे वागणं मला योग्य वाटत नाही. कोहलीच्या हॉटेल रुमचा व्हिडीओ लीक झाल्यानंतर विराटने त्याच्या गोपनीयतेबद्दल ( Privacy ) प्रश्न उपस्थित केला आहे. कोहलीने चाहत्यांना त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा आणि प्रायव्हसीचा आदर करण्याचं आवाहन केलं आहे.
View this post on Instagram
विराटने इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटलंय, 'मला माहिती आहे की चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंना पाहून खूप आनंदी आणि उत्साही होतात. चाहते खेळाडूंना भेटायला उत्सुक असतात, ही फार चांगली बाब आहे. पण येथे हा व्हिडीओ भयावह आहे आणि यामुळे माझ्या प्रायव्हसीबद्दल ( Privacy ) प्रश्न उपस्थित झाला आहे. जर मला माझ्या स्वतःच्या हॉटेलच्या खोलीत प्रायव्हसी ( Personal Space ) मिळत नसेल, तर दुसरीकडे कुठे मिळेल? मी वागण्याचा निषेध करतो आणि माझ्या प्रायव्हसीसाठी हे धोकादायक आहे. कृपया लोकांच्या गोपनीयतेचा आदर करा आणि त्यांच्याकडून मनोरंजनाची वस्तू म्हणून पाहू नका.'