Dinesh Karhtik : हो स्वप्नं पूर्ण होतात! विश्वचषकाच्या संघात जागा मिळाल्यानंतर दिनेश कार्तिकचं भावनिक ट्वीट व्हायरल
Team India : टी20 विश्वचषकासाठी बीसीसीआयनं संघाची घोषणा नुकतीच केली असून संघात ऋषभ पंतसोबत दिनेश कार्तिक यालाही संधी देण्यात आली आहे.
Team india for ICC T20 World Cup : भारतीय क्रिकेटमध्ये (Indian Cricket Team) सध्या खेळणाऱ्या दिग्गज खेळाडूंमध्ये एक सर्वात अनुभवी खेळाडू म्हटलं तर यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik). महेंद्रसिंह धोनीच्या समकालिन असल्याने आपोआपोच संघाबाहेर गेलेला कार्तिक एकवेळ तर कॉमेन्ट्री करण्यासाठी सज्ज झाला होता. त्यामुळे तो निवृत्तीच घेणार असं वाटतं होतं. पण आयपीएल 2022 मध्ये आरसीबीकडून दमदार खेळी करत सर्वाधिक स्ट्राईक रेटच्या जोरावर त्याने थेट टीम इंडियामध्ये एन्ट्री मिळवली आणि आता आगामी आयसीसी टी20 विश्वचषकासाठीही संघात त्याने जागा मिळवली आहे. त्याच्या या स्वप्नवत कामगिरीनंतर त्याने हो स्वप्न पूर्ण होतात! (Dreams do come true) असं भावनिक ट्वीट केलं आहे. ज्यावर त्याचे चाहतेही रिप्लाय करत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
Dreams do come true 💙
— DK (@DineshKarthik) September 12, 2022
टी20 विश्वचषकासाठीही भारतीय संघ जाहीर
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा विचार करता रवींद्र जाडेजा दुखापतग्रस्त झाल्यामुळे अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय बुमराहसह हर्षल पटेलही दुखापतीतून सावरल्यामुळे ते दोघेही संघात परतले आहेत. अर्शदीपलाही एक लेफ्ट हँड पेसर म्हणून संघात जागा दिली आहे. तर नेमकी टीम इंडिया कशी आहे ते पाहूया...
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.
राखीव खेळाडू
मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर
दिनेश कार्तिक 2004 पासून खेळतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेट
दिनेश कार्तिकनं 2004 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वात पहिला सामना खेळला. त्याची वर्षी त्यानं कसोटी क्रिकेटमध्येही पदार्पण केलं होतं. राहुल द्रविडच्या नेतृत्वात त्यानं पहिला कसोटी सामना खेळला. दरम्यान, 2006 पासून टी-20 क्रिकेटला सुरुवात झाली. वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्वात 2006 मध्ये भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळला. त्यावेळी दिनेश कार्तिक भारतीय टी-20 संघाचा भाग होता.
आयपीएल 2022 मध्ये दिनेश कार्तिकची कामगिरी
यंदाच्या हंगामात दिनेश कार्तिकनं चमकदार कामगिरी करून दाखवली. बंगळुरूकडून खेळताना कार्तिकनं संघासाठी फिनिशरची भूमिका योग्य प्रकारे निभावली आहे. या हंगामातील 15 सामन्यात कार्तिकनं 10 वेळा नाबाद राहात 324 धावांचा पाऊस पाडलाय. आरसीबीकडून सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमही त्याच्या नावावर आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
