एक्स्प्लोर

इंग्लंडविरुद्ध 140 धावांची झंझावाती खेळी करणारा कॅलम मॅक्लिओड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

Calum MacLeod Retirement: स्कॉटलँडचा तडाखेबाज फलंदाज कॅलम मॅक्लिओडनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय.

Calum MacLeod Retirement: स्कॉटलँडचा तडाखेबाज फलंदाज कॅलम मॅक्लिओडनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. मॅक्लिओडनं 2007 मध्ये स्कॉटलँडसाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकातील (T20 World Cup 2022) स्कॉटलँडच्या संघाचा तो सदस्य होता. दरम्यान, निवृत्ती जाहीर करताना मॅक्लिओड म्हणाला की, 1999 च्या एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलँड यांच्यातील सामना पाहिल्यानंतर मला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मिळाली. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताना मॅक्लिओड म्हणाला की, “या विश्वचषकानंतर निवृत्त होणे कठीण आहे.  कारण आम्ही जे यश मिळवण्यासाठी आलो होतो, ते आम्हाला मिळालेलं नाही. योग्य संधी आणि पाठबळ मिळाल्यास हा संघ खूप पुढं जाईल आणि अनेकांना प्रेरणा देईल अशी इच्छा मनात ठेवून मी संघाची साथ सोडत आहे.  मला माझ्या देशाकडून 229 सामने खेळण्याची संधी मिळाली, याचा मला अभिमान वाटतो. मला वाटते की, मी खेळायला सुरुवात केली तेव्हापासून संघ खूप चांगल्या स्थितीत आहे.”

ट्वीट-

मॅक्लिओडची अवस्मरणीय खेळी
पाच विश्वचषक खेळलेल्या मॅक्लिओडनं 2018 मध्ये आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी खेळली. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्यानं 140 धावांची झंझावती खेळी केली होती. मॅक्लिओडच्या या वादळी खेळीच्या जोरावर स्कॉटलँडच्या संघानं इंग्लंडसमोर 372 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं होतं. या रोमहर्षक सामन्यात स्कॉटलंडच्या स्कॉटलँडच्या संघानं इंग्लंडचा चार धावांनी धुव्वा उडवला. मॅक्लिओडने 87 एकदिवसीय सामन्यांमध्ये 3 हजार 24 धावा केल्या आहेत, ज्यात 10 शतकं आणि 13 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्यानं 64 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1 हजार 239 धावा केल्या आहेत.

टी-20 विश्वचषकात स्कॉटलँडची निराशाजनक कामगिरी
यंदाच्या टी-20 विश्वचषकात स्कॉटलँडच्या संघाची कामगिरी निराशाजनक ठरली. टी-20 विश्वचषकाच्या पात्रता फेरीतील तीन पैकी दोन सामन्यात स्कॉटलँडच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला. ज्यामुळं पात्रता फेरीतच स्कॉटलँडच्या संघाला आपलं सामान गुंडळावं लागलं. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
Supriya Sule Beed: अमित शाहांची गुप्त भेट, मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरला, मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांची मस्ती उतरवा!
अमित शाहांची गुप्त भेट, मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरला, मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांची मस्ती उतरवा!
Mumbai Crime News: युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
SIP : शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 18 Feb 2025 : ABP Majha : सकाळी 10 च्या हेडलाईन्सSupriya Sule Santosh Deshmukh Mother:लेकराला स्वयंपाक केला,5 रिंग वाजल्या देशमुखांच्या आईचा टाहोChhatrapati Sambhajinagar : हर हर महादेव, शिवजयंतीनिमित्त Ambadas Danve यांची तलवारबाजीABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 18 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
सुप्रिया सुळेंसमोरच संतोष देशमुखांच्या आईच्या अश्रूंचा फुटला बांध; म्हणाल्या, मी माझं लेकरू कुठं शोधू?
Supriya Sule Beed: अमित शाहांची गुप्त भेट, मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरला, मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांची मस्ती उतरवा!
अमित शाहांची गुप्त भेट, मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरला, मस्साजोगमध्ये जाऊन सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्यांची मस्ती उतरवा!
Mumbai Crime News: युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
युपीमधील जमिनीच्या वादाचा मुंबईत घेतला बदला! प्रेमाचं नाटक, भेट अन् लोखंडी रॉड व दगडाने ठेचून केला शेवट
SIP : शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
शेअर बाजारात घसरण सुरुच, म्युच्युअल फंडमधील SIP थांबवावी की सुरु ठेवावी? सहा प्रमुख मुद्दे
आहेराच्या पाकिटात 1 रुपयाचं नाणं देण्याचं कारण काय?
आहेराच्या पाकिटात 1 रुपयाचं नाणं देण्याचं कारण काय?
Santosh Deshmukh Case: बीड पोलीस ॲम्बुलन्समधून संतोष देशमुखांची बॉडी घेऊन वेगळ्याच दिशेने गेले, पण मस्साजोगच्या तरुणांनी पाठलाग केल्याने 'तो' घाणेरडा प्लॅन फसला?
बीड पोलीस ॲम्बुलन्समधून संतोष देशमुखांची बॉडी घेऊन वेगळ्याच दिशेने गेले, पण मस्साजोगच्या तरुणांनी पाठलाग केल्याने 'तो' घाणेरडा प्लॅन फसला?
Shahaji Bapu Patil : एक दिवस आदित्यच उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याची भाषा करतील, शहाजीबापूंची तुफान टोलेबाजी
एक दिवस आदित्यच उद्धव ठाकरेंना सोडून जाण्याची भाषा करतील, शहाजीबापूंची तुफान टोलेबाजी
Torres Scam : टोरेस गैरव्यवहाराबाबत मोठी अपडेट, मुंबईकरांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या टोळीने बल्गेरियात नवा बिझनेस थाटला
टोरेस गैरव्यवहाराबाबत मोठी अपडेट, मुंबईकरांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या टोळीने बल्गेरियात नवा बिझनेस थाटला
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.