Zimbabwe vs West Indies: 'भारतात जाण्याच्या ओढीमुळे सामना जिंकवला'; ODI वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये वेस्ट इंडिजला हरवल्यानंतर सिकंदर रझा याची प्रतिक्रिया
Zimbabwe vs West Indies : सिकंदर रझा याने या सामन्यात अष्टपैलू खेळीचं प्रदर्शन करत झिम्बाब्वेच्या विजयात सिंहाचा वाटा उचललाय.
Sikandar Raza Statement : आयसीसी 2023 वनडे वर्ल्ड कपच्या (ICC 2023 One Day World Cup) क्वालिफायर सामन्यात झिम्बाब्वेने वेस्ट इंडिजचा (West Indies) 35 धावांनी पराभव केला. सिकंदर रझा झिम्बाब्वेच्या (Zimbabwe) या विजयाचा हिरो ठरलेला. भारतात जाण्याच्या ओढीमुळे वेस्ट इंडिजविरोधात विजय मिळवता आला, असे सिकंदर रझा याने सामन्यानंतर बोलताना म्हटलेय. सिकंदर रझा याने या सामन्यात अष्टपैलू खेळीचं प्रदर्शन करत झिम्बाब्वेच्या विजयात सिंहाचा वाटा उचललाय.
वेस्ट इंडीजविरोधात झालेल्या सामन्यात सिकंदर रझा याने अष्टपैलू खेळीचं प्रदर्शन केले. सिकंदर याने फलंदाजीत 68 धावांचे योगदान दिले तर गोलंदाजी करताना वेस्ट इंडिजच्या दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. सामन्यानंतर सिकंदर रझा म्हणाला की, 'सामन्यापूर्वी संघातील सहकाऱ्यांना शौर्य आणि प्रमाणिकपणाने खेळण्याचा सल्ला दिला होता. प्रत्येकानं आपला सर्वोत्तम खेळ केल्यास आपला विजय होईल. जगातील सर्वोत्तम संघ ठरण्यापासून आपण काही पावलं दूर आहोत. '
'सिकंदर रझा पुढे म्हणाला की, आपली गोलंदाजी उत्कृष्ट आहे. पण आम्ही 20 ते 30 धावा कमी केल्या असल्याचं सुरुवातीला वाटलं. पण भारतात विश्वचषक खेलण्यासाठी जाण्याच्या ओढीमुळे या धावा भरुन काढल्या. सर्वोत्तम क्रिकेट खेळल्यास आपण जिंकू शकतो. त्याशिवाय या विजयामध्ये प्रेक्षकांनीही मोठी भूमिका बजावली.' अटीतटीच्या लढीत वेस्ट इंडिजचा पराभव झाल्यानंतर झिम्बाब्वे संघाच्या प्रेक्षकांनी जल्लोष केला होता.
वर्ल्ड कप क्वालिफायरच्या 13 व्या सामन्यात (ICC 2023 One Day World Cup) झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना 49.5 षटकांत 268 धावांपर्यंत मजल मारली होती. सिकंदर रझा याने अर्दशतकी खेळी केली. प्रत्युत्तरादाखल, दोन वेळचा विश्वचषक विजेता वेस्ट इंडिजचा संघ 44.4 षटकांत अवघ्या 233 धावांत आटोपला. झिम्बाब्वेने हा सामना 35 धावांनी जिंकला. दरम्यान, सिकंदर रझा याने आयपीएलमध्येही दमदार कामगिरी केली होती. तो आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा झिम्बाब्वेचा पहिला खेळाडू ठरला. सिकंदर पंजाब किंग्स संघाचा सदस्य आहे.
पॉइंट टेबलची सद्याची स्थिती
क्वालिफायर फेरीत 10 संघांना दोन गटात विभागण्यात आलं आहे. अ गटातून झिम्बाब्वे, नेदरलँड आणि वेस्ट इंडिज सुपर-6 साठी पात्र ठरले आहेत. ब गटातील एकही संघ सुपर-6 मध्ये पोहोचू शकलेला नाही. मात्र, श्रीलंका, ओमान आणि स्कॉटलंडला सुपर-6मध्ये स्थान मिळवण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसात याचं चित्र स्पष्ट होईल.
टॉप-2 संघ होतील मुख्य सामन्यात पात्र
आयसीसी 2023 वनडे वर्ल्ड कप (ICC 2023 One Day World Cup) 10 संघांमध्ये खेळवला जाणार आहे. यातील 8 संघ सरळ क्वालीफायमध्ये पोहोचले आहेत.आता आणखी 2 संघ क्वालीफायमध्ये पोहोचणार आहेत.
हेही वाचा: