एक्स्प्लोर

Mohammad Nabi: मोहम्मद नबीनं अफगाणिस्तानचं कर्णधारपद सोडलं, ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव जिव्हारी

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील आपल्या अखेरच्या आणि महत्वपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं चार धावांनी अफगाणिस्तानचा धुव्वा उडवला.

T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील आपल्या अखेरच्या आणि महत्वपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं अफगाणिस्तानचा (AUS vs AFG) चार धावांनी धुव्वा उडवला. या पराभवानंतर अफगाणिस्तानच्या संघाचा कर्णधार मोहम्मद नबीनं (Mohammad Nabi) आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. मोहम्मद नबीनं ट्विटरवरद्वारे संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. यंदाच्या टी-20 विश्वचषकात अफगाणिस्तानच्या संघाला एकही सामना जिंकता आला नाही. टी-20 विश्वचषकातील ​​आमचा प्रवास येथेच संपला आहे.आम्ही चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही, अशा शब्दात नबीनं दिलगिरी व्यक्त केली. तसेच संघाच्या कामगिरीबद्दल त्यानं निराशा दर्शवली. महत्वाचं म्हणजे, कर्णधारपदावरून पायउतार झालेला मोहम्मद नबी अफगाणिस्तानच्या संघासाठी पुढं क्रिकेट खेळण सुरूच ठेवणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर नबीनं ट्विटरवर इमोशनल पोस्ट लिहली. "आमचं यंदाच्या टी-20 विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलंय. आम्हाला मिळालेल्या निकालाची आमच्या संघाला किंवा आमच्या समर्थकांनाही अपेक्षा नव्हती. सामन्यांच्या निकालानं तुम्ही जितके निराश आहात, तितकेच आम्हीही निराश आहोत. गेल्या काही दौऱ्यांमध्ये संघ व्यवस्थापन, निवड समिती आणि मी एका विचारानं पुढे जात नव्हतो, ज्याच्या संघाच्या संतुलनावर परिणाम झाला. यामुळं मी आदारानं कर्णधारपदावरून पायउतार होत असल्याची घोषणा करत आहे. मी माझ्या देशासाठी खेळत राहीन."

मोहम्मद नबीचं ट्वीट-

अफगाणिस्तानचा चार धावांनी पराभव
ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत आजच्या दिवसातील दुसरा सामना यजमान संघ ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान (Australia vs Afghanistan) यांच्यात खेळवला गेला. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 4 धावांनी विजय मिळवत सेमीफायनलच्या शर्यतीतील आपलं आव्हान जिवंत ठेवलं आहे. अफगाणिस्ताननं सामना गमावला असला तरी त्यांनी दिलेली अखेरच्या चेंडूपर्यंतची झुंज वाखाणण्याजोगी होती. खासकरुन राशीद खाननं 23 चेंडूत नाबाद 48 रन केले. पण तो संघाला विजय मिळवून देण्यास अपयशी ठरला. आधी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियानं दिलेलं 169 धावाचं आव्हान पार करतान अफगाणिस्तानचा संघ 20 ओव्हरमध्ये 164 धावाच करु शकला.

राशीद खानची एकाकी झुंज व्यर्थ
टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील आपल्या अखेरच्या आणि महत्वपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं चार धावांनी अफगाणिस्तानचा धुव्वा उडवला. या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघानं अफगाणिस्तानसमोर 169 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघानं 164 धावा केल्या. अखेरच्या षटकात अफगाणिस्तानच्या संघाला 22 धावांची गरज असताना स्टार ऑलराऊंडर राशीद खाननं (Rashid Khan) एकाकी झुंज देत ऑस्ट्रेलियाची धाकधूक वाढवली. मात्र, संघाला विजय मिळवून देण्यास तो अपयशी ठरला. 

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
Embed widget