एक्स्प्लोर

पी. व्ही. सिंधूला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचं उपविजेतेपद

स्पेनच्या ऑलिम्पिक विजेत्या कॅरोलिना मरिनने अंतिम सामन्यात सिंधूचा 21-19, 21-10 असा पराभव केला. रिओ ऑलिम्पिकच्या फायनलमध्येही सिंधूला कॅरोलिना मरिनकडूनच हार स्वीकारावी लागली होती.

नानजिंग : भारताच्या पी. व्ही. सिंधूला जागतिक बॅडमिंटन विजेतेपद स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. स्पेनच्या ऑलिम्पिक विजेत्या कॅरोलिना मरिनने अंतिम सामन्यात सिंधूचा 21-19, 21-10 असा पराभव केला. रिओ ऑलिम्पिकच्या फायनलमध्येही सिंधूला कॅरोलिना मरिनकडूनच हार स्वीकारावी लागली होती. पण आजच्या फायनलमध्ये सिंधूने 15-11 अशी आघाडी घेऊन पहिल्या गेमवर वर्चस्व राखलं होतं. त्यानंतर कॅरोलिना मरिनने आक्रमक खेळ करून सिंधूचं वर्चस्व मोडून काढलं. मरिनने इतक्या वेगाने गुण वसूल केले की, सिंधू तिच्यासमोर हतबल झालेली दिसली. अखेर मरिनने 21-19, 21-10 असा विजय मिळवून विजेतेपदावर जागतिक विजेतेपदावर तिसऱ्यांदा आपलं नाव कोरलं. 2017 च्या ग्लासगोमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सिंधू आणि नोझोमी ओकुहारा ही जोडी अंतिम सामन्यात भिडली होती. पण त्यावेळी ओकुहाराने सिंधूचा संघर्ष तीन सेट्समध्ये मोडीत काढत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं होतं. तो पराभव बाजूला सारुन जागतिक अजिंक्यपदाच्या या स्पर्धेत भारताला पहिलंवहिलं सुवर्णपदक जिंकून देण्याची संधी सिंधूसमोर पुन्हा एकदा चालून आली होती. सिंधूने आजवरच्या कारकीर्दीत या स्पर्धेची तीन पदकं पटकावली आहेत. त्यात 2013 आणि 2014 साली कांस्य तर 2017 च्या रौप्यपदकाचा समावेश आहे. पण जागतिक अजिंक्यपदाच्या सोनेरी यशाने तिला वारंवार हुलकावणी दिली. त्यामुळे जिनपिंगच्या बॅडमिंटन कोर्टवर पहिल्यांदा सुवर्णपदक जिंकण्याची तिला संधी होती. यंदाचं वर्ष सिंधूसाठी विजेतेपदाच्या दृष्टीने निराशाजनक ठरलं. इंडिया ओपन आणि थायलंड ओपनमध्ये अंतिम फेरीत धडक मारुनही विजेतेपद तिच्यापासून केवळ एक पाऊल दूर राहीलं. अखेर पुन्हा एकदा तिला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक

ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 

भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा

Embed widget