Parul Chaudhary : भारताच्या पारुल चौधरीने राष्ट्रीय विक्रम मोडला, महिला 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये 11 व्या स्थानावर
Parul Chaudhary : पारुलने राष्ट्रीय विक्रम साधत पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्रता मिळवली आहे.
Parul Chaudhary : भारताच्या पारुल चौधरीने (Parul Chaudhary) हंगेरी येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 (World Athletics Championships) मध्ये महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये 11 वे स्थान मिळविले. त्यात तिने 9:15.31 च्या वेळेसह नवीन राष्ट्रीय विक्रम केला आहे. याचबरोबर पारुलने राष्ट्रीय विक्रम साधत पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्रता मिळवली आहे.
स्टीपलचेसमध्ये, ब्रुनेईचा अॅथलीट विन्फ्रेड मुटाइल यावीने 8:54.29 च्या वेळेसह सुवर्णपदक जिंकले. केनियाच्या बीट्रिस चेपकोचने हंगामातील सर्वोत्कृष्ट 8:58.98 सह रौप्य पदक जिंकले आणि दुसर्या केनियाच्या फेथ चेरोटिचने 9:00.69 च्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह कांस्यपदक मिळवले.
पारुल चौधरी 200 मीटर स्प्लिटमध्ये स्टीपलचेसमध्ये आघाडीवर होती पण तिने गती गमावली आणि 11 व्या स्थानावर राहिली. तसेच, 2900 मीटरच्या स्प्लिटपर्यंत, ऍथलीटने शेवटच्या 100 मीटर स्प्लिटमध्ये दोन स्थानांनी झेप घेत 13 व्या क्रमांकावर होता. यामुळे तिला 11 वे स्थान मिळवता आले.
भारतीय संघाने 400 मीटर रिले शर्यतीत विक्रम केला
जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाने 400 मीटर रिले शर्यतीच्या अंतिम फेरीत धडक मारली असून, संघ पाचव्या स्थानावर आहे. मुहम्मद अनस याहिया, अमोज जेकब, मुहम्मद अजमल आणि राजेश रमेश यांच्या भारतीय संघाने 2:59.05 सेकंदात शर्यत पूर्ण केली. यापूर्वी, एका आशियाई संघाने 400 मीटर रिले शर्यत सर्वात कमी वेळेत दोन मिनिटे 59.51 सेकंदात पूर्ण केली होती. जपानच्या संघाने हा पराक्रम केला.
पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले
या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले. 400 मीटर रिले शर्यतीचा व्हिडीओ शेअर करताना पंतप्रधानांनी इंस्टाग्रामवर लिहिले: “जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये अविश्वसनीय टीमवर्क! अनस, अमोज, राजेश रमेश आणि मुहम्मद अजमल यांनी M4X400m रिलेमध्ये अंतिम फेरीत प्रवेश करून नवीन आशियाई विक्रम केला. भारतीय ऍथलेटिक्ससाठी हे खरोखर ऐतिहासिक, विजयी पुनरागमन म्हणून लक्षात राहील.”
नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास
जागतिक भालाफेक स्पर्धेत भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने दणदणीत कामगिरी केली आहे. नीरजने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे. त्याने 88.17 मीटरपर्यंत भालाफेक केली. तर, पाकिस्तानी खेळाडू नदीम अर्शद दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि त्याला रौप्यपदक जिंकण्यात समाधान मानावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या :
Neeraj Chopra : भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास!