ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 09 Jan 2025 : Maharashtra Politics
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 09 Jan 2025 : Maharashtra Politics
आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू तर ४० जखमी, वैकुंठ एकादशीसाठी ऑनलाइन बुकिंगची मागणी वाढल्याने तिकीट वितरण केंद्रांवर गर्दी
गर्दीच्या हिशेबाने व्यवस्था का नाही, तिरुपती चेंगराचेंगरीप्रकरणी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी अधिकाऱ्यांना फटकारलं, तर पंतप्रधान मोदी, राहुल गांधींकडून शोक व्यक्त
बारामतीत आज शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार, कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनानिमित्त दोघं एकत्र येणार असल्याची माहिती
विधानसभा निवडणुकीत संघानं केलेल्या प्रचाराचं शरद पवारांकडून तोंडभरून कौतुक...लोकसभेतल्या घवघवीत यशामुळे गाफील राहिल्याचीही दिली कबुली...
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणाला एक महिनापूर्ण.. हत्येच्या निषेधार्थ आज राज्यभरातील ग्रामपंचायतींचं काम बंद आंदोलन
सुरेश धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमिनी बळकावण्यासारख्या आरोपांची मोठी यादी, अमोल मिटकरींचा गंभीर आरोप...तर मिटकरींना राष्ट्रवादीची मुन्नी आरोप करायला सांगतेय, धस यांचा पलटवार...