एक्स्प्लोर

Cidco Homes : सिडकोनं 26 हजार घरांच्या किमती जाहीर करताच अर्जदार संतापले, धूळफेक झाल्याचा आरोप, संजय शिरसाट म्हणाले...

Cidco Homes : सिडकोनं माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना आणली होती. याद्वारे 26 हजार घरांची विक्री करण्यात येणार होती.या घरांच्या किमती पहिल्यांदा जाहीर करण्यात आल्या नव्हत्या.

नवी मुंबई : सिडकोने दोन महिन्यांपुर्वी नवी मुंबईतील विविध भागात असलेल्या घरांची लॅाटरी जाहीर करताना घरांच्या किंमतीचा उल्लेख केलेला नव्हता. वाशी , खारघर , तळोजा , भागातील गृहप्रकल्पातील घरे घेण्यासाठी लोकांच्या उड्या पडल्या होत्या. मात्र या घरांच्या किंमती करोडच्या घरात असल्याने अर्ज भरणार्यांच्या डोळ्यात सिडकोने धुळफेक केल्याचा आरोप लोकांनी केलाय. वाशीतील घरांच्या किंमती थेट 75 ते 80 लाखांच्या घरात आहेत. तर खारघर मधील घर 1 कोटीच्या वर जाणार आहे. खासगी बिल्डरांप्रमाणे सिडको घरांच्या किंमती लावत आहेत. आधीच घरांच्या किंमती जाहीर करून लॅाटरी काढली असती तर ज्यांची पात्रता नाही त्यांनी अर्ज भरलेच नसते. सव्वालाखांच्या वर लोकांनी घरांसाठी अर्ज भरल्याने सिडकोकडे मोठी रक्कम जमा झाली.दुसरीकडे आयटी रिटर्न , उत्पन्नाचा दाखला, डोमोसाईल आदी कागदपत्रांसाठी 5 हजारांच्या वर खर्च आल्याने हा फुकट गेलाय, असा आरोप देखील अर्जदारांनी केला.

सिडकोकडून फसवणूक, अर्जदारांचा आरोप 

सिडकोमध्ये वाशीसाठी विचार केला होता. 40 ते 50 लाखांचं बजेट अपेक्षित होता, तो 73 ते 75 लाखांपर्यंत दर जाहीर केला आहे. सामान्य माणसांच्या क्षमतेच्या पलीकडे आहे. खारघरमध्ये दर  48 ते 50 लाखांपर्यंत गेला आहे. तो 30 ते 35 लाखांपर्यंत असायला हवा होता. फॉर्म भरुन चुकीचं झालं आहे. अर्ज भरायला मुदतवाढ दिली गेली. सिडकोनं अगोदर दर जाहीर करायला हवे होते. 236 रुपयांप्रमाणं सव्वा लाख अर्जांची किती किमत होते. अर्ज दाखल करण्याची मुदत वारंवार वाढवण्यात आली. सिडकोनं अर्जदारांची फसवणूक केली आहे. सामान्य लोकांना परवडणारी घरं नाहीत.सिडकोनं  236 रुपये देखील परत द्यावेत.कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी हजारो रुपये खर्च करावा लागला. सिडको सुरुवातीला अर्ध्या दरात किंवा परवडणाऱ्या किंमतीत घर देईल, असं सांगितलं जात होतं. मात्र, 73 लाखांचं घर  78 लाखांवर जाऊ शकतं, लोकांना ते परवडणार नाही, असं अर्जदार प्रदीप पाटील म्हणाले. 

सिडको अर्जदार, सिडकोनं अगोदर किमती जाहीर करायला हव्या होत्या. लोकांनी त्यांच्या उत्पन्नानुसार इथं परवडत असेल तर अर्ज केला असता. इतका दर द्यायचा असेल तर सिडको ऐवजी दुसरा विचार केला होता. सिडकोकडून वारंवार वाढवण्यात आलेल्या तारखांवरुन देखील नाराजी व्यक्त केली. कागदपत्रांची जुळवणी करण्यासाठी देखील अर्जदारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. सिडकोनं दर कमी करावेत, अशी अपेक्षा देखील अर्जदार अनिकेत पाटील यांनी व्यक्त केली.

मी वाशीला घर घेणार होतो, तिथं दर 70 लाखांच्या वर गेला आहे. तो दर किमान 50 लाखांच्या दरम्यान असायला हवा होता. इतका दर असेल तर परवडणार नाही. एखादा व्यक्ती 50 हजार रुपये दरमहा कमवत असेल तर सगळे पैसे त्यामध्येच जाऊ शकतात. घरखर्चासाठी देखील पैसे राहणार नाहीत. या किमतीत बाहेर चांगलं घर, चांगलं ठिकाण भेटेल. फसवणूक झालीय, पैसे परत करा किंवा किमती कमी करा, असं अर्जदार शुभम पाटील म्हणाले. 

वाटलं तर फेरविचार करु : संजय शिरसाट

सामाजिक न्याय मंत्री आणि सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे.  सिडकोनं लॉटरी काढलेली त्यात लोकेशन आहेत.  काही प्राईम आहेत, स्टेशन जवळील काही आहेत. काही ठिकाणी रेट कमी आहेत. काही ठिकाणी किंमती वाढलेल्या असतील तर आढावा घेऊ, असं संजय शिरसाट म्हणाले.  आम्ही नफा कमावणारी कंपनी नाही, यासंदर्भात वाटलं तर फेरविचार करु, असंही त्यांनी म्हटलं. बिल्डर हा एरीया बिल्टअप एरिया देतो आम्ही कार्पेट एरिया देतो, संजय शिरसाट म्हणाले.

इतर बातम्या : 

Cidco Lottery 2024 : सिडकोचं सर्वात स्वस्त घर तळोजामध्ये, महाग घर खारघरमध्ये, 26000 घरांच्या किमती जाहीर, नोंदणी कशी करायची?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : 6.30 AM : 09 January 2025 : माझं गाव, माझा जिल्हा : ABP MajhaSpecial Report NCP :कोणत्या खासदाराला फोन? फोडफोडीचं राजकारण किती दिवस चालणार?Special Report Amol Mitkari VS Suresh Dhas : धस हेच बीडच्या इतिहासातील आका, मिटकरींचे गंभीर आरोपSpecial Report Uddhav Thackeray : मिशन मुंबई महापालिका, ठाकरेंच्या शिवसेनेचं एकला चलो रे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Somnath Suryavanshi : सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
Embed widget