एक्स्प्लोर

पुढच्या कसोटीत खेळणार की नाही? विराट म्हणतो...

लॉर्डस कसोटीदरम्यान विराटला पाठदुखीचा त्रास होत असल्याचं सातत्यानं जाणवलं. एखादा फटका खेळून धावा घेताना होणारा त्रास विराटच्या चेहऱ्यावर दुसऱ्या डावात प्रकर्षानं जाणवला.

लंडन: टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यातल्या लागोपाठ दुसऱ्या कसोटीत स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाइतकीच कर्णधार विराट कोहलीची दुखापतही चिंतेची बाब आहे. लॉर्डस कसोटीदरम्यान विराटला पाठदुखीचा त्रास होत असल्याचं सातत्यानं जाणवलं. एखादा फटका खेळून धावा घेताना होणारा त्रास विराटच्या चेहऱ्यावर दुसऱ्या डावात प्रकर्षानं जाणवला. अखेर टीम इंडियाचे फिजियो पॅट्रिक फरहात यांनी मैदानात उतरुन विराटच्या पाठीला मसाज दिला. त्यांनीच दिलेली वेदनाशमक गोळी घेऊन मग विराटनं पुन्हा फलंदाजी सुरू केली. पुढच्या पाच दिवसांच्या विश्रांतीत आपण या पाठदुखीतून सावरु, असा विश्वास विराटनं व्यक्त केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला नॉटिंघहॅममध्ये 18 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या कसोटीसाठी मी फिट होईन, असं विराटने सांगितलं. या कसोटीत कोहलीने दुसऱ्या डावात 29 चेंडूत 17 धावा केल्या. स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर तो ओलिवर पोपच्या हाती झेलबाद झाला. कोहली म्हणाला, “पाठीच्या खालच्या भागाच्या दुखापतीने उचल खाल्ली आहे. शरिरावरील अतिताण आणि अधिक सामने खेळल्यामुळे आहे. मात्र पुढच्या कसोटीदरम्यान 5 दिवस मिळतात, तोपर्यंत मी ठिक होईन” चुकीचा संघ घेऊन मैदानात उतरल्याने पराभव : विराट कोहली 36 कसोटी सामन्यांचं नेतृत्त्व केल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला पहिल्यांदाच एका डावाने पराभव स्वीकारावा लागला. लॉर्ड्समध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताला एक डाव आणि 159 धावांनी धूळ चारली. चुकीच्या संघासोबत मैदानात उतरल्यामुळे हा पराभव झाला, असं स्पष्टीकरण विराट कोहलीने दिलं आहे. भारताचा मोठा पराभव विराट कोहलीची टीम इंडिया एजबॅस्टनपाठोपाठ लॉर्डस कसोटीतही चारीमुंड्या चीत झाली आहे. इंग्लंडनं टीम इंडियाचा या कसोटीत एक डाव आणि 159 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह इंग्लंडनं पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या कसोटीत इंग्लंडनं काल चौथ्या दिवशी सात बाद 396 धावसंख्येवर आपला पहिला डाव घोषित केला. त्यामुळं डावाचा मारा चुकवण्यासाठी टीम इंडियासमोर 289 धावांचं आव्हान होतं. पण इंग्लंडच्या प्रभावी आक्रमणासमोर भारताचा दुसरा डाव 130 धावांत गडगडला. लॉर्डस कसोटीत टीम इंडिया पहिल्या डावात 107 धावांत गारद झाली होती. याचा अर्थ भारतीय फलंदाजांना दोन्ही डावात मिळून केवळ 237 धावा जमवता आल्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी दुसऱ्या डावात भारताच्या प्रत्येकी चार फलंदाजांना माघारी धाडलं. संबंधित बातम्या  पुढच्या कसोटीत खेळणार की नाही? विराट म्हणतो... 

चुकीचा संघ घेऊन मैदानात उतरल्याने पराभव : विराट कोहली 

आधी मैदानाची सफाई, नंतर रेडिओ विक्री, अर्जुनचं सर्वत्र कौतुक  

लॉर्ड्स कसोटीत भारताचा एक डाव आणि 159 धावांनी पराभव 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget