एक्स्प्लोर
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेच?
मुंबईः भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याची चिन्ह दिसत आहेत. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आज बीसीसीआयच्या सल्लागार समितीनं कोलकात्यात पाच उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
यामध्ये रवी शास्त्री, टॉम मूडी, लालचंद राजपूत, प्रवीण अमरे आणि अनिल कुंबळे यांचा समावेश होता. बीसीसीआयच्या सल्लागार समितीत सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मणसह सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे. परंतु सचिन सध्या परदेशात असल्यानं तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुलाखतींसाठी उपलब्ध होता.
सर्व उमेदवारांच्या मुलाखती झाल्या असल्या तरी आता टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी अखेर कोणाची वर्णी लागते, याबाबत मोठी उत्सुकता लागली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement