एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ग्लुकोज बिस्किट, लिटील मास्टर गावसकरांचा विक पॉइंट
मुंबई: वेस्ट इंडिज दौऱ्यात आपल्या उत्कृष्ठ फलंदाजीने भारतीय संघाचे माजी सलामीवीर फलंदाज सुनील गावसकर यांनी वेस्ट इंडिज संघाला घाम आणला होता. आपल्या डिफेंन्सीव फलंदाजीने त्यांनी भारताला भक्कम धावांची आघाडी मिळवून दिली. पण त्यावेळीही त्यांचा एक विक पॉइंट होता. तो म्हणजे, पारले जी ग्लुकोज बिस्किट.
रविवारी क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये लिजंड क्लब द्वारे सुनील गावस्करांच्या 67 व्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांची लहान बहीण नूतनने याचा खुलासा केला.
नूतन यांनी पत्रकारांना सांगितले की, ''सुनील गावस्करांना 'पारले जी' ग्लुकोज बिस्किटे खुप आवडतात. वेस्ट इंडिज दौरा त्यांचा सर्वात मोठा दौरा होता. तिथे ते चहा किंवा कॉफीसोबत पारलेची ग्लुकोज बिस्किटे खात. त्यामुळे ते जेव्हा वेस्ट इंडिज दौऱ्यावर जात तेव्हा आम्ही त्यांच्या बॅगेत 'पारले जी'च्या ग्लुकोज बिस्किट ठेवण्याची व्यवस्था करत असू.''
त्या पुढे म्हणाल्या की, ''गावसकर हे आपल्या दौऱ्याची तयारी करताना बॅगेत बिस्किटचे पुरेसे पुडे ठेवत. पण हे पुडे तीन आठवडे किंवा एका महिन्याच्या आतच हे सर्व पुडे संपायचे. मग अशावेळी आम्ही त्यांना एखादा पत्रकार किंवा नातेवाईकांकडून हे पुडे पाठवत असू.''
मुंबईचे माजी सलामीवीर फलंदाज शिशिर हटंगडींनी सांगितले की, ''वेस्ट इंडिजचे सर्वच जलदगती गोलंदाज लिटील मास्टर सुनील गावस्करांचा आदर करत. हटंगडी म्हणाले की, ''एका चॅरेटी टूर्नामेंटसाठी सर्व जलदगती गोलंदाज रवी शास्त्रींच्या घरी जमले होते, आणि बिअर पिण्याचा आनंद घेत होते. या कार्यक्रमाला सुनिल गावस्कर भारतीय पेहरावात आले. त्यावेळी वेस्ट इंडिजचे सर्व खेळाडू उठून उभे राहिले, आणि गावसकरांना अभिवादन करून म्हणाले की, ''हॅलो मास्टर, तुम्ही कसे आहात.'' या गोलंदाजांमध्ये मायकल होल्डिंग, जोएल गार्नर, मॅल्कम मार्शल आणि एंडी रॉबर्टस होते.''
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
Advertisement