एक्स्प्लोर
वकार युनूस पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार
![वकार युनूस पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार Waqar Younis Steps Down As Pakistan Coach वकार युनूस पाकिस्तानच्या प्रशिक्षकपदावरुन पायउतार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/04/04212533/Waqar-Younis-compressed-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लाहोर : पाकिस्तान क्रिकेट संघाचा प्रशिक्षक वकार युनूसने अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शाहिद आफ्रिदने रविवारीच पाकिस्तानच्या ट्वेन्टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर लाहोरमध्ये झाालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर वकार युनूसने अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
भारतात खेळवण्यात आलेल्या ट्वेन्टी-20 विश्वचषकात पाकिस्तानचा संघ साखळी फेरीतच गारद झाला. त्यामुळे कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि प्रशिक्षक वकार युनूस यांच्यावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली होती. तसंच विश्वचषकाआधीही पाकिस्तानला आशिया चषक आणि न्यूझीलंडमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
त्याच निराशाजनक कामगिरीचा मोठा फटका कर्णधार आफ्रिदी आणि प्रशिक्षक वकार युनूस यांना बसला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मूव्ही रिव्हिव्ह
पुणे
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)