एक्स्प्लोर
आम्हाला विजयाची सवय लागली पाहिजे: विराट कोहली
अँटिगा: 'जगभरात चांगलं प्रदर्शन करायचं असल्यास सतत विजय मिळवत राहण्याची सवय ठेवायला हवी.' असं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला. भारतानं वेस्टइंडिजवर पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 92 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
विजयानंतर कर्णधार कोहली म्हणाला की, 'आम्हाला विजयाची सवय लागली पाहिजे. ही खरं तर चांगली सवय आहे. जर आम्ही कसोटी जिंकणं शिकलो तर प्रत्येक देशात जिंकायला शिकू. त्यामुळे आम्हाला प्रत्येक सामन्यात चांगलं प्रदर्शन करावं लागेल.'
गोलंदाजांचं कौतुक करताना कोहली म्हणाला की, 'गोलंदाजांनी चांगलं प्रदर्शन केलं. आम्ही पहिल्या डावात म्हणावी तशी गोलंदाजी केली नव्हती. पण दुसऱ्या डावात आम्ही चांगली गोलंदाजी केली. अश्विन आणि मिश्रानं चांगली गोलंदाजी केली.'
विजयानं नवा कोचचं स्वागत टीम इंडियानं कले असून कोहली आणि कुंबळेनी या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement