एक्स्प्लोर
Advertisement
विराट क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या ड्रीम टीमच्या कर्णधारपदी
सिडनी : टीम इंडियाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीची क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या 2016 सालच्या ड्रीम टीमचा कर्णधार म्हणून निवड झाली आहे.
कोहलीने 2016 या वर्षात कसोटीत शानदार कामगिरी बजावली आहेच, शिवाय त्याच्या नेतृत्त्वाखालीच टीम इंडिया कसोटीत अव्वल स्थानी पोहोचली. मात्र आयसीसीच्या कसोटी संघात विराटला स्थान मिळू शकलं नाही.
सप्टेंबर 2015 ते सप्टेंबर 2016 या कालावधीतील कामगिरीच्या आधारे आयसीसीने कसोटी संघाची निवड केली होती. त्यामुळे विराटचा त्या संघात समावेश झाला नाही. मात्र गेल्या बारा महिन्यांतल्या कामगिरीच्या आधारे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निवडलेल्या संघात कोहलीचा कर्णधार म्हणून समावेश झाला आहे. कोहलीबरोबरच भारताचा अष्टपैलू आणि आयसीसीचा प्लेयर ऑफ द ईयर अश्विनचाही या संघात समावेश आहे.
विशेष म्हणजे या संघात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला संघात बारावा खेळाडू म्हणून निवडण्यात आलं आहे. तर सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरचा संघात समावेशही झालेला नाही.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाची ड्रीम टीम :
विराट कोहली (कर्णधार) भारत
अजहर अली (पाकिस्तान)
जो रूट (इंग्लंड)
स्टिव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)
बेन स्टोक्स (इंग्लंड)
जॉनी बेअरस्टॉ (इंग्लंड)
क्विंटन डि कॉक (दक्षिण आफ्रिका)
आर. अश्विन (भारत)
रंगना हेराथ ( श्रीलंका),
मिशेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)
कगिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
राजकारण
Advertisement