एक्स्प्लोर
Advertisement
विराटकडून आई आणि अनुष्काला महिला दिनाच्या शुभेच्छा
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या आयुष्यातलं अभिनेत्री अनुष्का शर्माचं स्थान पुन्हा अधोरेखित केलं आहे. महिला दिनाच्या निमित्ताने विराटने त्याच्या आईला आणि अनुष्काला शुभेच्छा दिल्या आहेत.
व्हॅलेंटाईन डेला विराटने ट्विटरवर खुलेआमपणे अनुष्काला शुभेच्छा दिल्या होत्या, मात्र काही वेळातच त्याने तो ट्वीट डिलीट केला. आता मात्र महिला दिनाचं औचित्य साधत विराटने आईसोबतच अनुष्काचे आभार मानले आहेत.
'सर्व स्त्रियांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, विशेषतः माझ्या आयुष्यातल्या दोन खंबीर महिलांना. कठीण काळात माझ्या कुटुंबाची काळजी घेणाऱ्या माझ्या आईला आणि प्रतिकूल गोष्टींशी कायम लढा देत सत्याच्या बाजूने उभं राहणाऱ्या अनुष्काला शुभेच्छा.' अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर त्याने लिहिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
मुंबई
नागपूर
Advertisement