एक्स्प्लोर
टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदावरुन संजय बांगर यांची उचलबांगडी, नवे प्रशिक्षक कोण?
भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीतून स्पर्धेबाहेर व्हावे लागले होते. त्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षक यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर BCCI ने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवले होते

(Getty Images)
मुंबई : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी पुन्हा रवी शास्त्री यांची पुन्हा एकडा निवड झाल्यानंतर फलंदाजी प्रशिक्षकपदावर संजय बांगर यांचीच निवड होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण विराट कोहलीच्या टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदावरुन संजय बांगर यांना डच्चू देण्यात आला आहे. बांगर यांच्याऐवजी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून माजी कसोटीवीर विक्रम राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून आर. श्रीधर यांना कायम ठेवण्यात आलं आहे.
भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीतून स्पर्धेबाहेर व्हावे लागले होते. त्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षक यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर BCCI ने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवले होते. त्यानंतर या सर्व निवड करण्यात आल्या आहेत.
माजी सलामीवीर विक्रम राठोड यांची कारकीर्द ?
- सहा कसोटी सामने
- सात एकदिवसीय सामने
- पंजाबमधून राज्यस्तरीय क्रिकेट सामने
- 20106 मध्ये राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























