एक्स्प्लोर
विदर्भाने इराणी करंडकासह मनंही जिंकली, पुरस्काराची रक्कम शहीदांच्या परिवाराला
या घोषणेनं विदर्भाला इराणी करंडकापाठोपाठ भारतीय नागरिकांची मनंही जिंकून दिली. इराणी करंडक विजयासाठी मिळालेली इनामाची रक्कम शहीद कुटुंबियांच्या निधीला देणार असल्याचं विदर्भाचा कर्णधार फैझ फझलनं जाहीर केलं आहे.
नागपूर : फैझ फझलच्या विदर्भानं लागोपाठ दुसऱ्या वर्षी रणजी करंडकापाठोपाठ प्रतिष्ठेच्या इराणी करंडकावरही आपलं नाव कोरलं आहे. नागपूरच्या नव्या व्हीसीए स्टेडियमवरच्या इराणी करंडक सामन्यात शेष भारतानं विदर्भाला विजयासाठी 280 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर विदर्भानं आपला दुसरा डाव पाच बाद 269 धावसंख्येवर घोषित केला. त्यामुळं हा सामना अनिर्णीत राहिला. पण विदर्भाला पहिल्या डावातल्या आघाडीच्या निकषावर विजयी घोषित करण्यात आलं.
इराणी करंडकातल्या विजयासाठी मिळालेली इनामाची रक्कम आपण पुलवामात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या कुटुंबियाच्या निधीला देत असल्याची घोषणा विदर्भाचा कर्णधार फैझ फझलनं केली आहे. त्याच्या या घोषणेनं विदर्भाला इराणी करंडकापाठोपाठ भारतीय नागरिकांची मनंही जिंकून दिली. संजय रघुनाथ आणि अथर्व तायडेनं दुसऱ्या विकेटसाठी 116 धावांची भागीदारी रचून विदर्भाच्या दुसऱ्या डावाचा भक्कम पाया पाया घातला. विदर्भाकडून गणेश सतीशनं 87, अथर्व तायडेनं 72, संजय रघुनाथनं 42, तर मोहित काळेनं 35 धावांची खेळी उभारली. अक्षय कर्णेवारचं पहिल्या डावातलं शतकही विदर्भाच्या विजयात निर्णायक ठरलं. दरम्यान, शेष भारतच्या हनुमा विहारीनं इराणी करंडकाच्या लागोपाठ तीन डावात शतक झळकावण्याचा पराक्रम गाजवला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. विहारीनं यंदाच्या इराणी करंडकात विदर्भाविरुद्धच्या दुसऱ्या डावात 114 धावांची दमदार खेळी उभारली. त्याआधी याच सामन्याच्या पहिल्या डावात त्यानं नाबाद 180 धावा केल्या होत्या. मात्र तो संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. हनुमा विहारीनं 2018 च्या इराणी करंडकातही 183 धावांची खेळी साकारली होती.Rest of India vs Vidarbha - Match Drawn Vidarbha took first innings lead @Paytm #IraniCup #VIDvROI Scorecard:https://t.co/nzIFXjuHhN
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 16, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement