एक्स्प्लोर
प्रशिक्षकपद स्वीकारण्यापूर्वी कुंबळेचा धोनी आणि कोहलीला मेसेज
मुंबईः प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर भारताचा माजी गोलंदाज अनिल कुंबळेला कसोटी कर्णधार विराट कोहली आणि वन डे कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत कुंबळेनेही जॉईन करण्यास उत्सुक असल्याचं ट्विटरद्वारे म्हटलं आहे.
कुंबळेने अनेक दिग्गजांची विकेट घेत भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदी आपलं नावं कोरलं. त्यानंतर भारताच्या सर्वच खेळाडूंनी कुंबळेला निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये हरभजन सिंह, युवराज सिंह, अजिंक्य रहाणे, आर. अश्विन यांच्यासह भारताच्या अनेक खेळाडूंचा समावेश आहे.
https://twitter.com/anilkumble1074/status/746031693207732224
प्रशिक्षकपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. भारतीय संघासाठी तुमची निवड ही मोठी गोष्ट आहे, असं विराट कोहलीने म्हटलं आहे.
विराटला उत्तर देताना कुंबळेनेही संघात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे, असं म्हटलं आहे. विराटसोबतच कुंबळेने धोनीलाही झिम्बाब्वे दौऱ्यातील यशाबद्दल शुभेच्छा देताना भारतीय संघासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.
https://twitter.com/anilkumble1074/status/746003898398183424
संबंधित बातम्याः
'माझ्या मुलाखतीसाठी गांगुली उपस्थितच नव्हता', रवी शास्त्री
भारतीय क्रिकेटला 'अच्छे दिन' येणार : गावसकर
57 अर्ज, 21 वैध, एकट्या कुंबळेची निवड, 16 वर्षांनी भारतीय प्रशिक्षक !
अनिल कुंबळे टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement