एक्स्प्लोर
उमेश यादवचं विकेट्सचं शतक, स्मिथ ठरला शंभरावा बळी!
बंगळुरूच्या वन डेत उमेश यादव हाच भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.
बंगळुरु: भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवनं बंगळुरूत वन डे सामन्यांच्या कारकीर्दीतलं बळीचं शतक साजरं केलं. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ हा त्याची शंभरावी विकेट ठरला. आपल्या 71 व्या वन डे सामन्यात त्याने 100 विकेट्सचा टप्पा गाठला.
बंगळुरूच्या वन डेत उमेश यादव हाच भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. ऑस्ट्रेलियाच्या डावातल्या पाचपैकी चार फलंदाजांना त्यानंच माघारी धाडलं. उमेश यादवनं 10 षटकांत 72 धावा मोजून चार फलंदाजांच्या विकेट्स काढल्या.
ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय
बंगळुरुच्या चौथ्या वन डेत ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 335 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न अखेर अयशस्वी ठरला. ऑस्ट्रेलियानं भारतावर 21 धावांनी मात केली
पाच सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत भारताने तीन विजय मिळवले आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या नावे एक विजय जमा झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement