एक्स्प्लोर
यू मुम्बाचा बंगळुरुवर अवघ्या एका गुणानं निसटता विजय!
![यू मुम्बाचा बंगळुरुवर अवघ्या एका गुणानं निसटता विजय! U Mumba Beat Bangalore Bulls यू मुम्बाचा बंगळुरुवर अवघ्या एका गुणानं निसटता विजय!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/08221339/U-Mumba_Bengal-Warriors-580x395-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: अनुप कुमारच्या यू मुम्बानं बंगळुरु बुल्सवर 24-23 असा एका गुणानं निसटता विजय मिळवला. पाटणातल्या पाटलीपूत्र स्पोर्टस कॉम्पलेक्समध्ये हा सामना खेळविण्यात आला होता.
या सामन्यात अनुप कुमारनं चढाईत नऊ आणि पकडीत दोन अशी अकरा गुणांची कमाई करुन यू मुम्बाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. राकेश कुमार आणि सुनील कुमारनं प्रत्येकी तीन गुण वसूल करुन यू मुम्बाच्या विजयाला हातभार लावला.
दरम्यान, बंगळुरु बुल्ससाठी रोहित कुमार आणि सुरेंदर नाडानं प्रत्येकी पाच गुणांची कमाई केली. पण त्यांची ही खेळी बंगळुरुला विजय मिळवून देऊ शकली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्रीडा
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)