एक्स्प्लोर
ऑस्ट्रेलियाविरुध्दचा दुसरा टी 20 सामना पावसामुळे रद्द
भारताला 11 षटकांत 90 धावांचं सुधारीत लक्ष्य देण्यात आलं. मात्र सततच्या पावसामुळे पंचांनी खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी कायम ठेवली आहे.

मेलबर्न : मेलबर्नमध्ये सुरु असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या दुसऱ्या टी 20 सामन्याचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं 19 षटकांत सात बाद 132 धावांची मजल मारली होती. पण पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यानंतर भारताला 11 षटकांत 90 धावांचं सुधारीत लक्ष्य देण्यात आलं. मात्र सततच्या पावसामुळे पंचांनी खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी कायम ठेवली आहे. मेलबर्नमध्ये सुरु असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या दुसऱ्या टी 20 तही पावसानं व्यत्यय आणला. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियानं 19 षटकांत सात बाद 132 धावांची मजल मारली होती. पण डकवर्थ लुईस पद्धतीनुसार टीम इंडियाला 11 षटकांत 90 धावांचं सुधारीत लक्ष्य देण्यात आलं होतं. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कांगारुंवर सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवलं. भुवनेश्वर कुमार आणि खलिल अहमदनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडत ऑस्ट्रेलियन फलंदाजीला सुरुंग लावला. त्यानंतर जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव आणि कृणाल पंड्यानंही प्रत्येकी एक विकेट घेत आपली जबाबदारी चोख बजावली. ऑस्ट्रेलियाकडून बेन मॅकडरमॉटनं सर्वाधिक नाबाद 32 धावांचं योगदान दिलं. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. या सामन्यात भारताला मालिकेत बरोबरी करण्याची संधी होती. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात विजय मिळवून, तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सद्यस्थितीत ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय संघासमोर फारसा मजबूत दिसत नाही. मात्र पहिल्या सामन्यात महत्वाच्यावेळी धावा आणि विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाच्या संघाने भारतावर विजय मिळवला होता.
आणखी वाचा























