एक्स्प्लोर
पार्थिव पटेल की रिद्धीमान साहा? उत्तर शतकाने दिलं
हैदराबाद: भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहानं बांगलादेशविरुद्ध एकमेव कसोटीत शतक ठोकून आपली निवड अगदी सार्थ ठरवली.
या कसोटीत पार्थिव पटेलला खेळवायचं की साहाला दुखापतीतून पुनरागमनाची संधी द्यायची असा प्रश्न निवड समितीसमोर होता. त्यातून साहाला झुकतं माप मिळालं होतं.
साहानं हैदराबादमध्ये बांगलादेशच्या गोलंदाजीवर आक्रमण चढवून आपण अगदी फिट असल्याचं दाखवून दिलं तसंच संघातलं आपलं स्थानही आणखी पक्कं केलं. साहाचं हे कसोटी कारकीर्दीतलं दुसरं शतक ठरलं आहे.
चांगली कामगिरी बजावणाऱ्या पण दुखापतींमुळं संघाबाहेर जावं लागलेल्या खेळाडूंच्या पाठीशी उभं राहण्याची संघ व्यवस्थापनाची भूमिका सकारात्मक असल्याची प्रतिक्रिया, रिद्धिमान साहानं दिली. हैदराबादमध्ये शतक झळकावल्यावर साहानं पत्रकारांशी संवाद साधला.
संबंधित बातम्या
कोहली, तू साहाचं ऐकायला हवं होतं!
VIDEO : अर्धशतकानंतर जाडेजाची ‘तलवारबाजी’
ब्रॅडमन, द्रविड यांचा विक्रम मोडला, विराट..क्रिकेटचा नवा डॉन
कोहली, साहाने दुसरा दिवस गाजवला, भारताचा पहिला डाव 687 धावांवर घोषित
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement