एक्स्प्लोर
Advertisement
भारताने 70 वर्षांनी इतिहास रचला, ऑस्ट्रेलियन भूमीत कसोटी मालिका विजय
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिडनी कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिल्यामुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-1 अशी खिशात घातली.
सिडनी : टीम इंडियाने तब्बल 70 वर्षांनी ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून नवा इतिहास रचला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सिडनी कसोटी पावसामुळे अनिर्णित राहिली. त्यामुळे टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-1 अशी खिशात घातली.
टीम इंडियाने या कामगिरीसह ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिला-वहिला मालिकाविजय साजरा केला. गेल्या सत्तर वर्षात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात एकही कसोटी मालिका जिंकता आली नव्हती. पण यावेळी विराट कोहलीच्या टीम इंडियाने यजमानांना धूळ चारत एक नवा इतिहास लिहिला.
भारताने या कसोटी मालिकेत अॅडलेड कसोटीत 31 धावांनी विजय मिळवला होता. ऑस्ट्रेलियाने पर्थ कसोटी जिंकून मालिकेत आपलं आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. पण भारताने मेलबर्नची तिसरी कसोटी 146 धावांनी जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती.
ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत भारताची आजवरची कामगिरी
1947-48 : भारत 4-0 ने पराभूत
1967-68 : भारत 4-0 ने पराभूत
1977-78 : भारत 3-2 ने पराभूत
1980-81 : मालिका 1-1 अशी अनिर्णित
1985-86 : मालिका 0-0 अशी अनिर्णित
1991-92 : भारत 4-0 ने पराभूत
1999-2000 : भारत 3-0 ने पराभूत
2003-04 : मालिका 1-1 अशी अनिर्णित
2007-08 : भारत 2-1 ने पराभूत
2011-12 : भारत 4-0 ने पराभूत
2014-15 : भारत 2-0 ने पराभूत
2018-19 : भारत 2-1 ने विजयी
सिडनी कसोटीच्या चौथ्या दिवशी पावसामुळे अवघ्या 24.5 षटकांचाच खेळ होऊ शकला होता. पहिलं सत्र पावसामुळे पूर्णपणे वाया गेलं. त्यानंतर दुसऱ्या सत्रात चहापानानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली होती. पंचांनी चौथ्या दिवशी खेळ थांबवला त्यावेळी फॉलोऑननंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात बिनबाद सहा धावांची मजल मारली. टीम इंडियाकडे 316 धावांची भक्कम आघाडी जमा होती.
सिडनी कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंतच्या दमदार शतकांमुळे टीम इंडियाने सिडनी कसोटीत आपला पहिला डाव सात बाद 622 धावांवर घोषित केला होता. भारताने ऑस्ट्रेलियात उभारलेली ही दुसरी सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement