एक्स्प्लोर
पैलवान सुशिल कुमार WWE मध्ये दिसणार?
1/8

या संदर्भातील माहिती देताना सुशील कुमार म्हणाला की, ''माझी नुकतीच WWE च्या टॅलेंट डेव्हलपमेंट प्रमुखांशी भेट झाली. मला कुस्तीचा सराव सुरुच ठेवायचा असल्याने या भेटीनंतर माझ्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत.'' याचाच अर्थ हौशी कुस्तीला 'गुडबाय' करणं होतो का? असं विचारलं असता त्याने याला स्पष्ट नकार दिला.
2/8

तो म्हणाला की, ''मी हौशी (अमॅच्यूअर) कुस्ती सोडली असा याचा अर्थ होत नाही. कारण मला कुस्तीचा सराव कायम ठेवण्यासाठी इतर पर्यायही हताळायचे आहेत.'' रमण रहेजांची कंपनी सुपर स्पोर्टस सुशीलचा व्यवसाय पाहते. सुशील कुमारच्या WWE मधील सहभागासंबंधी ते म्हणाले की, ''WWE ने गेल्या काही काळापासून भारतातील आपला विस्तार वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत. यासंदर्भातच सुशील कुमारची गेल्या चार महिन्यांपासून सुशील कुमारसोबत चर्चा सुरु आहे.''
Published at : 17 Oct 2016 08:52 PM (IST)
View More























