एक्स्प्लोर
Advertisement
स्पेन सुप्रीम कोर्टाकडून मेस्सीच्या शिक्षेत कपात
मेड्रिड : स्पेनच्या सुप्रीम कोर्टानं बुधवारी अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेस्सीला दिलासा देत त्याच्या शिक्षेत कपात केली आहे. मेस्सीला करचुकवेगिरी प्रकरणी त्याला 21 महिन्यांची शिक्षा ठोठावली होती. त्यात स्पेनच्या सुप्रीम कोर्टाने कपात करुन 15 महिने केली आहे. मात्र, स्पेनच्या सुप्रीम कोर्टानं मेस्सीच्या वडिलांची शिक्षा कायम ठेवली आहे.
मेस्सीला करचुकवेगिरीच्या एकूण तीन प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली होती. त्याच्यावर 45.9 लाख डॉलर्स कर चुकवल्याचा आरोप आहे. तर त्याच्या वडिलांनी नुकतीच करचुकवेगिरीतील रक्कम भरली होती. त्यामुळे आपल्या शिक्षेत कपात करावी अशी त्याच्या वडिलांनी मागणी केली होती.
पण न्यायालयाने याला नकार देत त्याच्या वडिलांची शिक्षा कायम ठेवली आहे. स्पेनच्या न्यायालयाने मेस्सीला 22.3 लाख डॉलर्स आणि त्याच्या वडिलांना 14.5 लाख डॉलर्सचा दंडही ठेठावला आहे.
दरम्यान, स्पेनच्या आयकर विभागाने मेस्सी आणि त्याचे वडील जॉर्ज या दोघांविरोधात भक्कमपणे खटला चालवून तुरुंगात पाठवण्याची मागणी केली होती. तसेच दोघांनीही जाहिरातींपासून मिळणारं उत्पन्न लपवलं. त्यासाठी त्यांनी बेलीज आणि उरुग्वे सारख्या कर नसणाऱ्या देशांमध्ये संपत्ती लपवली, असा दावा अधिकाऱ्यांनी केला होता.
संबंधित बातम्या
फुटबॉलपटू मेस्सी लायनल पुन्हा गोत्यात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement