एक्स्प्लोर
सिंधूचा हिरे आणि सोन्याचं रॅकेट देऊन सन्मान!
कोईम्बतूरः भारताची बॅडमिंटन स्टार आणि रिओ ऑलिम्पिकमधील रौप्य पदक विजेती पीव्ही सिंधूचा हिरे आणि सोन्याचं रॅकेट देऊन सन्मान करण्यात आला. भारतातील हिऱ्याचे प्रसिद्ध उद्योजक किर्तीलाल यांनी सिंधूच्या रिओमधील कामगिरीबद्दल गौरव केला. किर्तीलाल यांनी सिंधूचा सन्मान करण्यासाठी खास रॅकेट तयार केलं.
अशा पुरस्कारांमुळे खेळाडूंचं मनोबल वाढण्यास मोठी मदत होते, अशी भावना सिंधूने पुरस्कारानंतर व्यक्त केली. मुंबईमध्येही सिंधू आणि तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांचा सत्कार समारंभ 6 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
सिंधू रिओतील कामगिरीनंतर पहिल्यांदाच मुंबईत येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र बॅडमिंटन संघाचे अध्यक्ष अरुण लखानी सिंधू आणि गोपीचंद यांचा सत्कार करणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement