एक्स्प्लोर
शुबमन गिलचं नाबाद शतक, अनेक विक्रम नावावर
अंडर-19 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यातील आतापर्यंतचं हे पहिलं शतक आहे.
क्राईस्टचर्च (न्यूझीलंड) : पृथ्वी शॉच्या भारतीय संघाने पाकिस्तानचा 203 धावांनी धुव्वा उडवून, अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताने पाकिस्तानला विजयासाठी 274 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव अवघ्या 69 धावांत आटोपला.
या विजयात भारतीय गोलंदाज विजयाचे शिल्पकार ठरले. त्याचप्रमाणे मोठी धावसंख्या उभारण्यात मदत करणारा शुबमन गिलही या विजयाचा हिरो ठरला. त्याने 94 चेंडूत नाबाद 102 धावा केल्या. या शतकासोबतच त्याने अनेक विक्रमही नावावर केले.
भारत-पाकिस्तान सामन्यातील आतापर्यंतचं पहिलं शतक
अंडर-19 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यातील आतापर्यंतचं हे पहिलं शतक आहे. शुबमन गिलने शतक ठोकत पाकिस्तानच्या सलमान बट्टला मागे टाकलं. सलमान बट्टने 2002 साली भारताविरुद्ध अंडर-19 विश्वचषकात नाबाद 85 धावांची खेळी केली होती.
सर्वात वेगवान शतक ठोकणारा तिसरा भारतीय फलंदाज
दरम्यान, अंडर-19 विश्वचषकात सर्वात वेगवान शतक ठोकणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीतही त्याचा समावेश झाला आहे. सर्वात वेगवान शतक ठोकणारा तो तिसरा खेळाडू ठरला. विराट कोहलीने 2008 साली वेस्ट इंडिजविरुद्ध 73 चेंडूत, ऋषभ पंतने निमिबियाविरुद्ध 82 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं.
आयपीएलमध्ये 1.8 कोटींची बोली
आयपीएलमध्ये शुबमन गिल कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार आहे. केकेआरने 1.8 कोटी रुपयांची बोली लावत त्याला खरेदी केलं.
युथ वन डेत 1118 धावा
शुबमन मूळ पंजाबचा आहे. युथ वन डेत त्याच्या नावावर (2016-18) आतापर्यंत 14 सामन्यांमध्ये 1118 धावा आहेत. ज्यामध्ये 4 शतकं आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. 103.23 च्या सरासरीने त्याने धावा काढल्या आहेत.
या विश्वचषकात तीन अर्धशतकं, एक शतक
या विश्वचषकात शुबमनने पाच सामन्यातील चार इनिंगमध्ये 170.50 च्या सरासरीने 341 धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याने एका शतकासह 3 अर्धशतकं केली आहेत.
शुबमनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 63, पीएनजीविरुद्ध फलंदाजीची संधी मिळाली नाही, झिम्बाम्ब्वेविरुद्ध नाबाद 90 धावा, बांगलादेशविरुद्ध 86 आणि सेमीफायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध नाबाद 102 धावा केल्या.
सलग चार वेळा 50 पेक्षा जास्त धावा करणारा दुसरा खेळाडू
मेहदी हसन मिराजनंतर शुबमन सलग चार वेळा 50 पेक्षा जास्त धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत कुणीही सलग चार वेळा 50 पेक्षा जास्त धावा केलेल्या नाहीत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement