एक्स्प्लोर

SAvsIND: 'ती' एक चूक फार महागात पडली : शिखर धवन

18 व्या षटकात मिलरला एकदा नव्हे तर दोनदा जीवदान मिळालं. एकदा त्याचा झेल सुटला तर दुसऱ्यांदा यजुवेंद्र चहलने त्याला 'नो बॉल'वर बोल्ड केलं. त्यावेळी तो फक्त सात धावांवर होता. या जीवदानाचा त्यानेही पुरेपूर फायदा उठवला आणि 28 चेंडूत 39 धावा केल्या.

वांडरर्स, द. आफ्रिका : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे सहा सामन्याच्या मालिकेत द. आफ्रिकेचं आव्हान अद्यापही कायम आहे. दरम्यान, या सामन्यात शतक झळकावणाऱ्या शिखर धवनने पराभवाबद्दल बोलताना दोन महत्त्वाची कारणं सांगितली. या सामन्यात पावसाने दोनदा व्यत्यय आणला. त्यामुळे सामना बराच वेळ थांबवावा लागला. तर त्याच वेळी डेव्हिड मिलरला दोनदा जीवदान देणंही भारताला चांगलंच महागात पडलं. भारताने प्रथम फलंदाजी करताना 289 धावा केल्या होत्या. दरम्यान, द. आफ्रिकेचा डाव सुरु असताना 8व्या षटकात पावासाने हजेरी लावली. त्यामुळे या सामन्याचा संपूर्ण नूरच पालटला. जेव्हा पाऊस थांबला त्यांनतर आफ्रिकेला 28 षटकात 202 धावांचं नवं लक्ष्य देण्यात आलं. त्यानंतरही भारतीय संघाने चांगली गोलंदाजी करत द. आफ्रिकेच्या खेळाडूंना जखडून ठेवलं होतं. त्याचवेळी 18 व्या षटकात मिलरला एकदा नव्हे तर दोनदा जीवदान मिळालं. एकदा त्याचा झेल सुटला तर दुसऱ्यांदा यजुवेंद्र चहलने त्याला 'नो बॉल'वर बोल्ड केलं. त्यावेळी तो फक्त सात धावांवर होता. या जीवदानाचा त्यानेही पुरेपूर फायदा उठवला आणि 28 चेंडूत 39 धावा केल्या. त्यामुळे आफ्रिकेच्या विजयाचा मार्ग सोपा झाला. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना धवन म्हणाला की, 'पराभवाचं मुख्य कारण म्हणजे झेल सोडणं तर होतंच पण त्याचवेळी नो बॉलवर विकेट न मिळणं हेही एक कारण होतं. त्यानंतर सामन्याची लयच बदलली. नाहीतर आम्ही खूप चांगल्या स्थितीत होतो.' 'पावसामुळे गोलंदाजी करताना बराच फरक पडला. चेंडू सारखा ओला होत असल्याने आमच्या फिरकी गोलंदाजांना चेंडू फार वळवता येत नव्हता. त्यामुळे आमची गोलंदाजी फारशी चांगली झाली नाही. त्याचच फायदा द. आफ्रिकेच्या फलंदाजांनी घेतला.' असंही धवन म्हणाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
Tabu In Hollywood :  12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
Sanjay Raut: आम्ही तुरुंगात गेलो, आजारीही पडलो, डावा हात चालत नाही, पण कधीही त्याचं भांडवल केलं नाही: संजय राऊत
आम्ही तुरुंगात गेलो, आजारीही पडलो, डावा हात चालत नाही, पण कधीही त्याचं भांडवल केलं नाही: संजय राऊत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

PM Modi Varanasi :उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पंतप्रधान मोदीचं एनडीए नेत्यांसोबत शक्तिप्रदर्शनTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 01 Pm : 14 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 12 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPm Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल, योगी आदित्यनाथदेखील उपस्थित : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
Tabu In Hollywood :  12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
Sanjay Raut: आम्ही तुरुंगात गेलो, आजारीही पडलो, डावा हात चालत नाही, पण कधीही त्याचं भांडवल केलं नाही: संजय राऊत
आम्ही तुरुंगात गेलो, आजारीही पडलो, डावा हात चालत नाही, पण कधीही त्याचं भांडवल केलं नाही: संजय राऊत
Chhagan Bhujbal: राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
राम कदम, किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, पण छगन भुजबळांनी घेतली बाजू, म्हणाले...
Ramayana : 'रामायण'च्या रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट समोर; जाणून घ्या चित्रपट कधी रिलीज होणार...
'रामायण'च्या रिलीज डेटबद्दल मोठी अपडेट समोर; जाणून घ्या चित्रपट कधी रिलीज होणार...
नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट PM मोदींना धाडले पत्र 
नाशिकमध्ये 800 कोटींचा भूसंपादन घोटाळा, राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट PM मोदींना धाडले पत्र 
Aishwarya Divorce :  प्रसिद्ध गायिकेचा मोठा दावा, घटस्फोटासाठी ऐश्वर्याचे विवाहबाह्य प्रेमप्रकरण, अन्...
प्रसिद्ध गायिकेचा मोठा दावा, घटस्फोटासाठी ऐश्वर्याचे विवाहबाह्य प्रेमप्रकरण, अन्...
Embed widget