एक्स्प्लोर
VIDEO: भर मैदानात शिखर धवनचा भांगडा
शिखर धवनने भर मैदानात भांगडा करुन प्रेक्षकांसोबत मजा-मस्ती केली. सामना सुरु असताना सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या धवनने डान्स केला.
लंडन: इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाचव्या कसोटीचा पहिला दिवस इंग्लंडचा सलामीवीर अॅलिस्टर कूक आणि भारताच्या ईशांत शर्माने गाजवला. मात्र काल आणखी एका भारतीय खेळाडूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तो खेळाडू म्हणजे शिखर धवन होय.
शिखर धवनने भर मैदानात भांगडा करुन प्रेक्षकांसोबत मजा-मस्ती केली. सामना सुरु असताना सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या धवनने डान्स केला. चाहतेही धवन धवन असे ओरडत होते, तसा धवनही फुलत होता.
धवनच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय.
धवन सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता, त्यावेळी तिथे ढोल वाजत होते. ढोलच्या आवाजाने शिखरने भांगडा केला. मग प्रेक्षकांनाही हुरुप आला. प्रेक्षकांनी धवनच्या नावाने जल्लोष केला तसा धवननेही आपल्या अदा सादर केल्या.
या कसोटी सामन्यात इंग्लंड टीम एकवेळ 1 बाद 133 अशा भक्कम स्थिती होती. मात्र ईशांत, बुमरा आणि जाडेजाने चहापानानंतर भेदक मारा करत, दिवसअखेर 7 बाद 198 अशी अवस्था केली. इंग्लंडची ही अवस्था, प्रेक्षकांचं प्रोत्साहन आणि सोबतच्या ढोलताशांमुळे धवनच्या उत्साहाला उधाण आलं. संबंधित बातम्या ईशांत, बुमरा, जाडेजाची वेसण, दिवसअखेर इंग्लंडच्या 7 बाद 198 धावाshikhar dhawan's best contribution in this series so far#ENGvIND pic.twitter.com/92Hlq0FudV
— Nikhil Mane ???????????? (@nikhiltait) September 8, 2018
'शोले'तला कॉईन हवा होता, पाचव्यांदा टॉस हरल्यांनतंर कोहली उद्विग्न
पृथ्वी शॉला संधी नाहीच, हनुमा विहारीचं कसोटी पदार्पण अनोखा विक्रम : इंग्लंड दौऱ्यात विराटच्या नशिबात ‘काटा’च!अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement