एक्स्प्लोर
... म्हणून सेहवाग आतापर्यंत धोनीच्या राजीनाम्यावर बोलला नव्हता!
मुंबई : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाने अखेर महेंद्रसिंह धोनीच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्यावर मौन सोडलं आहे. धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर तीन दिवसांनी वीरेंद्र सेहवागने प्रतिक्रिया दिली.
धोनी आणि सेहवाग यांच्यात वाद असल्याची चर्चा क्रिकेट जगतात सुरु होती. मात्र, या वादावर सेहवाग किंवा धोनी यांनी कधीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यात धोनीच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्यानंतर तीन दिवस होत आले, तरी वीरुन साधं ट्वीटही केलं नव्हतं. त्यामुळे चर्चांना आणखीच उधाण आले होते.
आता वीरुने धोनीला पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देत सलाम केला आणि धोनीशी वाद असल्याच्या चर्चांनाही पूर्णविराम दिला.
धोनीच्या राजीनाम्यावर वीरु काय म्हणाला?
धोनीच्या राजीनाम्यावर बोलण्यासाठी 7 जानेवारीची वाट का पाहिली, याचं वीरुने स्पष्टीकरण दिले आहे. वीरुने क्रिकेट टॉकीजवर लिहिलं आहे की, “धोनीने 4 जानेवारीला भारतीय वन डे आणि टी-20 टीमच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. माझ्या अपेक्षेपेक्षा धोनीने थोडं लवकरच राजीनामा दिला. 7 क्रमांक धोनीचा आवडता आहे. मला वाटतं की, सातव्या नंबरवर खेळणाऱ्या एका विकेटकीपर आणि फलंदाजाला शुभेच्छा देण्यासाठी आजची तारीख (7 जानेवारी) योग्य आहे.”
वीरु पुढे म्हणाला आहे की, “मैदानावर धोनीची कर्णधार आणि खेळाडू म्हणून क्षमता सर्वांनाच माहित आहे. मात्र, यापुढेही जाऊन धोनी एक दिलदार माणूस आहे. त्यामुळे धोनी आणि त्याची टीम त्याच्या नेतृत्त्वात खेळलेल्या अखेरच्या सामन्यात आपल्या आईच्या नावाची जर्सी घालून मैदानात उतरली. धोनीच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. ”
https://twitter.com/virendersehwag/status/817571291121221632
अगदी साध्या गोष्टींवरही ट्वीट करुन प्रतिक्रिया देणाऱ्या वीरेंद्र सेहवागने धोनीच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्यानंतर कोणतंही ट्वीट केल्यानतंर या दोघांमधील कथित वादावर पुन्हा चर्चा सुरु झाल्या. मात्र, धोनीबद्दल बोलण्यास तीन दिवस का घालवले, यावरचं स्पष्टीकरण देऊन वीरुने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement