एक्स्प्लोर
तुझा स्वातंत्र्य दिन आज असेल ना? ट्विटरवरील प्रश्नाला सानियाचं उत्तर...
गेल्या दोन दिवसांपासून सानिया मिर्झा ट्रोल्सच्या निशाण्यावर आहे. मात्र आज तिने एका ट्रोलला झापलं, ज्याची चर्चा सोशल मीडियावरही चांगलीच रंगली.
मुंबई : टेनिसपटू सानिया मिर्झा आणि क्रिकेटर शोएब मलिक या दोघांना सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केले गेलेय. गेल्या दोन दिवसांपासून सानिया मिर्झा ट्रोल्सच्या निशाण्यावर आहे. मात्र आज तिने एका ट्रोलला झापलं, ज्याची चर्चा सोशल मीडियावरही चांगलीच रंगली.
@imsamkhiladi या ट्विटर हँडलवरुन सानिया मिर्झाला डिवचण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला दिसतो. या हँडल चालवणाऱ्या व्यक्तीने ट्वीटमध्ये सानियाला टॅग करुन म्हटले आहे, “सानिया, स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. तुझा स्वातंत्र्य दिन आज असेल ना?”
खरंतर आज पाकिस्तानाच स्वातंत्र्य दिन आहे. भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी लग्न केलं असून, सानिया आता गरोदर आहे. यावरुनच @imsamkhiladi या ट्विटर हँडलवरुन मुद्दाम सानियाला पाकिस्तानी ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सानियानेही सडेतोड उत्तर दिले आहे. सदर ट्विटर हँडलला उत्तर देताना सानिया म्हणाली, “जी नाही, माझा आणि माझ्या देशाचा (भारत) स्वातंत्र्य दिन उद्या (15 ऑगस्ट) आहे. माझा पती आणि त्यांच्या देशाचा (पाकिस्तान) स्वातंत्र्य दिन आज आहे. तुमचा गोंधळ संपला असेल, अशी आशा करतो. तुमचा स्वातंत्र्य दिन कधी आहे? तुम्ही अधिकच गोंधळलेलं दिसत आहात.”,Happy Independence @MirzaSania Aapka Independence Day Aaj Hai Na
— ROMEOᴳᴼᴸᴰ2.0 (@imsamkhiladi) August 14, 2018
सानिया मिर्झाने @imsamkhiladi या ट्विटर हँडलला दिलेल्या सडेतोड उत्तराची सोशल मीडियावर स्तुती होत आहे. सानियाने भले शोएबशी लग्न केले असेल, मात्र ती भारतीय असल्याचे कायमच ठणकावून सांगते.Jee nahi.. mera aur mere country ka Independence Day kal hai, aur mere husband aur unnki country ka aaj!! Hope your confusion is cleared !!Waise aapka kab hai?? Since you seem very confused .. https://t.co/JAmyorH0dV
— Sania Mirza (@MirzaSania) August 14, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement