एक्स्प्लोर
सचिनचं मोदी, विराटसह अनेक खेळाडूंना 'किटअप चॅलेंज'
तरुणांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनं 'किटअप चॅलेंज' नावाची मोहीम सुरु केली आहे. ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करुन सचिननं हे चॅलेंज सर्वांना दिलं आहे.
मुंबई : तरुणांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनं 'किटअप चॅलेंज' नावाची मोहीम सुरु केली आहे. ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करुन सचिननं हे चॅलेंज सर्वांना दिलं आहे. तुमच्या आवडत्या खेळासाठी तयार होऊन हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्याचं आव्हान सचिननं दिलं आहे.
क्रिकेटपटू विराट कोहली, फुटबॉलपटू संदेश झिंगन, हॉकीपटू सरदार सिंग, महिला क्रिकेटपटू मिताली राज, बॅडमिंटनपटू किदंबी श्रीकांत, पीव्ही सिंधू यांच्यासह अनेक खेळाडूंना सचिननं नॉमिनेट केलं आहे. या खेळाडूंनीही सचिनचं चॅलेंज स्वीकारलं असून लवकरच हे खेळाडू आपले व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करणार आहेत. सचिननं यावेळी स्वत: क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सचिननं पंतप्रधान कार्यालयालाही टॅग केलं आहे. आता हे चॅलेंज नरेंद्र मोदी स्वीकरणार का? आणि सचिननं नॉमिनेट केलेले खेळाडू चॅलेंज पूर्ण करतात का? हे लवकरच समोर येईल.I'm kitting up to go play the sport I love. Share a video of you playing the sport you love.
I nominate, @SandeshJhingan, @imsardarsingh8, @imVkohli, @M_Raj03, @srikidambi, @Pvsindhu1, @yesmrinmoy & @NavaniRajan.@PMOIndia #HumFitTohIndiaFit #KitUpChallenge #SportPLAYINGIndia pic.twitter.com/ZySVUBQq5e — Sachin Tendulkar (@sachin_rt) June 28, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement