एक्स्प्लोर
... म्हणून रिषभ पंत चेन्नईच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला!
वानखेडेवरील हा सामना जिंकल्यानंतर चेन्नईच्या खेळाडूंनी जबरदस्त सेलिब्रेशन केलं. मात्र या सेलिब्रेशनमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचा खेळाडू रिषभ पंतही सहभाग झाला.
मुंबई : चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करुन तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. वानखेडेवरील हा सामना जिंकल्यानंतर चेन्नईच्या खेळाडूंनी जबरदस्त सेलिब्रेशन केलं. मात्र या सेलिब्रेशनमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचा खेळाडू रिषभ पंतही सहभाग झाला.
रिषभ पंतला यंदाच्या आयपीएल मोसमात एमर्जिंग प्लेयर पुरस्काराने गौरवण्यात आलं. तो दिल्लीच्या जर्सीमध्ये चेन्नई सुपरकिंग्जच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला. भलेही दिल्ली डेअरडेव्हिल्सला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आलं नसलं तरी रिषभने मात्र स्वतःला सिद्ध केलं. ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये तो सर्वात पुढे होता.
रिषभने या आयपीएल मोसमात 14 सामन्यांमध्ये 52.61 च्या सरासरीने 684 धावा केल्या. यामध्ये त्याने आयपीएल करिअरमधलं पहिलं शतकही ठोकलं. त्याने 174 च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने या धावा केल्या.
चेन्नईच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्याचं कारण रिषभला विचारण्यात आलं. आपण धोनी भाई आणि रैनामुळे चेन्नईला सपोर्ट केला, असं रिषभने सांगितलं. चेन्नईच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होत रिषभने फोटो सेशनही केलं.
संबंधित बातम्या :
‘डॅड्स आर्मी’ ठरली आयपीएलची चॅम्पियन!
IPL: फायनलनंतर खेळाडूंवर पैशाचा पाऊस, कोणाला किती रक्कम?
8 खेळाडू तिशी पार, धोनी म्हणतो वय नाही, फिटनेस महत्त्वाचा!!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement