एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
म्हणून धोनीच्या हाती वेगवेगळे लोगो असलेल्या बॅट
धोनी जशी त्याची बॅट बदलतो, तसाच त्या बॅटवरचा स्पॉन्सरचा लोगोही बदललेला दिसतो. कधी बास, कधी वॅम्पायर, कधी एसजी, कधी एसएस, तर कधी आणखी कुठल्या तरी स्पॉन्सरची बॅट धोनीच्या हातात दिसते.
मुंबई : टीम इंडियाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीला हाणामारीच्या षटकातही आपला स्ट्राईक रेट उंचावण्यात येत असलेलं अपयश विश्वचषकात वारंवार दिसलं. पण तोच धोनी या विश्वचषकातल्या सामन्यात आपल्या बॅट्स ज्या गतीने बदलत आहे, ते खरोखरच अवाक करणारं आहे. त्यामागचं नेमकं कारण काय, हा प्रश्न धोनीच्या चाहत्यांसोबत ट्रोलर्सनाही पडला आहे.
धोनी जशी त्याची बॅट बदलतो, तसाच त्या बॅटवरचा स्पॉन्सरचा लोगोही बदललेला दिसतो. कधी बास, कधी वॅम्पायर, कधी एसजी, कधी एसएस, तर कधी आणखी कुठल्या तरी स्पॉन्सरची बॅट धोनीच्या हातात दिसते. त्यापैकी कुठल्याही बॅटमधून धावांचा ओघ काही वाहात नाही. पण धोनी त्याच्या आजवरच्या स्पॉन्सर्सचा प्रचार करताना हातचं राखून ठेवत नाही.
विश्वचषकात नुकत्याच झालेल्या बांगलादेश आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात धोनीने वापरलेल्या बॅटवर 'एसजी'चा लोगो दिसत होता. त्यानंतर आक्रमक फटकारे लगावण्याची वेळ येताच धोनीने दुसरी बॅट मागवली, त्यावर 'बास'चा लोगो होता.
'धोनी वेगवेगळ्या बॅट्स आणि त्यावर वेगवेगळे ब्रँड्स वापरत असल्याची गोष्ट खरी आहे. मात्र तो कोणाकडूनही पैसे आकारत नाही. करिअरच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मदत केल्याबद्दल धोनी अशाप्रकारे ऋण व्यक्त करत आहे.' असं धोनीचे मॅनेजर अरुण पांडे यांनी 'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
'धोनी मोठ्या मनाचा आहे. त्याच्याकडे पुरेसा पैसा आहे. चांगुलपणाच्या भावनेतून तो वेगवेगळे लोगो असलेल्या बॅट्स वापरत आहे. 'बास'ने सुरुवातीपासून त्याला साथ दिली. तर 'एसजी'ने त्याला बरंच सहाय्य केलं आहे.' असंही पांडेंनी स्पष्ट केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement