एक्स्प्लोर
आर. अश्विनचं 'त्या' पाकिस्तानी नागरिकाला सडतोड उत्तरं!
मुंबई: रिओ पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक पटकावणाऱ्या भारताच्या दीपा मलिक हिच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ट्विटरवरुनही तिला अनेकांनी आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत. टीम इंडियाचा फिरकीपटू आर. अश्विननं देखील दीपाला शुभेच्छा दिल्या. 'अतिशय प्रतिभावान या खेळाडूंनी देशाला प्रेरणा देण्याचं काम सुरु ठेवलं आहे. खूपच भारी दीपा मलिक.'
एकीकडे दीपावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु असताना पाकिस्तानमधील काही जणांना भारताचं हे यश पाहावलं जात नाही. पाकमधील एका व्यक्तीनं रिओ पॅरालिम्पिमधील खेळाडूंची थट्टा उडवण्याचा प्रयत्न केला. 'एवढी लोकसंख्या असलेल्या देशाला फक्त तीनच पदक...' असं ट्वीट त्यानं केलं.
या ट्वीटनंतर त्या पाकिस्तानी व्यक्तीला अश्विननं असं काही उत्तर दिलं की, ज्यानं त्याची बोलतीच बंद झाली. अश्विन म्हणाला की, 'लोकसंख्येच्या बाबतीत तुम्ही सहाव्या क्रमांकावर आहात. तुम्ही दुसरं पदक जिंकाल अशी आशा करतो. बंधु आणि भगिनींनो शुभेच्छा'@ashwinravi99 itni bari nation ... olympic may sirf 3 medals..... ha ha ha waht a joke
— amir nazar (@amiry2k2000) September 13, 2016
@amiry2k2000 I sincerely wish for our neighbours to be better than us and get 4 medals bare minimum. — Ashwin Ravichandran (@ashwinravi99) September 13, 2016अश्विन सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असतो. अनेकदा ते आपल्या चाहत्यांना उत्तरंही देतात. पण पाकिस्तानी नागरिकांनी खोडसाळपणे केलेल्या ट्वीटला अश्विननेही तसंच उत्तर दिलं आहे. भारतानं पॅरालिम्पिकमध्ये आतापर्यंत 4 पदकं पटकावली असून यामध्ये दोन सुवर्ण पदकं, एक रौप्य पदक आणि एक कांस्य पदक पटकावलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement