एक्स्प्लोर
राजकोट कसोटी : टीम इंडियाचा पहिला डाव आटोपला, इंग्लंडची 49 धावांची आघाडी
राजकोट : भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा डाव 488 धावात संपुष्टात आला आहे. चौथ्या दिवशीच्या खेळात भारताचे सर्व गडी बाद झाले आहेत. तसंच इंग्लंडने दुसरा डावही सुरु केला आहे.
इंग्लंडने सध्या आपल्या डावाला सुरुवात केली असून बिनबाद 100 धावाही बनवल्या आहेत. इंग्लंडकडे सध्या 149 धावांची आघाडी मिळाली आहे. इंग्लंडचे सलामीवीर अलिस्टर कूक आणि हमीद हे फलंदाजी करत आहेत. इंग्लंडच्या संघाला भारताच्या विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेची विकेट मिळाली आणि भारताचा डाव संपुष्टात आला आहे.
आजचा चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर काही वेळातच अजिंक्य रहाणे अन्सारीच्या फिरकी गोलंदाजीमुळे बाद झाला. तसंच विराटही 40 धावांची खेळी करत तंबूत परतला.
दोघेही बाद झाल्यानंतर अश्विन आणि रिद्धीमान साहाच्या जोडीनं अर्धशतकी भागीदारी करत भारतीय संघाला 400 धावांचा पल्ला गाठून दिला. सध्या भारतीय संघासमोर इंग्लंडच्या संघाला रोखण्याचं मोठं आव्हान आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement