Mexican Open Final: राफेल नदालची ऐतिहासिक कामगिरी! चौथ्यांदा मेक्सिको ओपनचं विजेतेपद पटकावलं
Mexican Open Final: स्पेनचा सुपरस्टार टेनिसपटू राफेल नदालनं (Rafael Nadal) चौथ्यांदा मेक्सिको ओपनच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावून विक्रम रचलाय.
Mexican Open Final: स्पेनचा सुपरस्टार टेनिसपटू राफेल नदालनं (Rafael Nadal) चौथ्यांदा मेक्सिको ओपनच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावून विक्रम रचलाय. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या नदालनं मेक्सिको ओपनच्या अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत 10व्या क्रमांकावर असलेल्या ब्रिटनच्या कॅमेरॉन नॉरीचा (Cameron Norrie) 6-4, 6-4 असा पराभव करून विजेतेपद पटकावलंय.
नदालनं आणि नॉरी यांच्यात पहिल्या सेटमध्ये चांगली झुंज पाहायला मिळाली. पहिल्या सेटमध्ये नदालनं नॉरीची सर्व्हिस ब्रेक केली. तर, नॉरीनंही नदालची एकदा सर्व्हिस ब्रेक केली. अखेर पहिल्या सेटमध्ये नदालनं 6-4 च्या फरकानं नॉरीला पराभूत केलं. दुसऱ्या सेटमध्ये नदालनं नॉरीला फारशी संधी दिली नाही. दुसऱ्या सेटमध्ये नदालनं 6-4 असा फरकानं सामना जिंकला. या दोन्ही खेळाडूंमधील हा तिसरा सामना होता. ज्यात नदालनं तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे.
मेक्सिको ओपन स्पर्धेच चौथ्यांदा विजेतेपद जिंकणारा तिसरा खेळाडू
मेक्सिको ओपन स्पर्धेचं 4 वेळा विजेतेपद जिंकणार राफेल नदाल तिसरा खेळाडू ठरलाय. नदालनं 2005, 2013 आणि शेवटच्या वेळी 2020 मध्ये हे विजेतेपद पटकावले होते. राफेल नदालचे हे 91वे एकेरी टेनिस विजेतेपद आहे. यापूर्वी, ऑस्ट्रियाचा थॉमस मस्टर आणि स्पेनचा डेव्हिड फेरर यांनी सर्वाधिक 4-4 वेळा मेक्सिको ओपन स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं होतं. नदालनं 2005, 2013 आणि शेवटच्या वेळी 2020 मध्ये हे विजेतेपद पटकावले होते. राफेल नदालचे हे 91वे एकेरी टेनिस विजेतेपद आहे.
हे देखील वाचा-
- Rohit Sharma: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात रोहित शर्माची विक्रमाला गवसणी
- Pune Marathon : देशात पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी मॅरेथॉन स्पर्धा; पुण्यात आयोजन, देशविदेशातील धावपटूंचा सहभाग
- IND vs SL : श्रेयस अय्यरची तुफानी फलंदाजी, भारताने श्रीलंकेला सात गड्यांनी हरवले
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha